---Advertisement---

कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा; ईपीएफओच्या व्याजदरात कोणतेही बदल नाही

On: March 4, 2021 3:29 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था अर्थात ईपीएफओने २०२०-२१ च्या व्याजदरासंदर्भातील मोठी घोषणा केली आहे. व्याजदर ‘जैसे थे’च ठेवले आहे. ८.५० टक्के राहणार असल्याची घोषणा केली आहे. म्हणजेच व्याजदरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

२०१९-२० मधील वार्षिक ८.५० टक्क्यांच्या तुलनेत चालू वर्षांतील व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. करोना तसेच लॉकडाउनमुळे आर्थिक चणचणीतील संघटनेच्या अनेक सदस्यांनी निधीतील रक्कम काढून घेण्याचे तसेच कमी योगदान देण्याचे धोरण अनुसरल्याने सरकारला अधिक व्याज देणे शक्य होणार नसल्याच्या चर्चा होत्या. मात्र या सर्व चर्चा चुकीचे असल्याचे आजच्या निर्णयावरुन स्पष्ट झालं आहे. ईपीएफओचा हा निर्णय सर्वसामान्यांना दिलासा देणारा असल्याचे सांगण्यात येत आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने वर्ष २०१८-१९ मधील ८.६५ टक्क्यांवरून पुढील वित्त वर्षांत दर कमी करत ते सात वर्षांच्या तळात आणून ठेवले होते. यापूर्वी, २०१२-१३ मध्ये दर ८.५० टक्के असे किमान होते. तुलनेत २०१६-१७ मध्ये ८.६५ टक्के, २०१७-१८ मध्ये ८.५५ टक्के, २०१५-१६ मध्ये ८.८० टक्के असे अधिक होते. यंदा हा दर ८.५० टक्के राहणार असून कोरना आणि लॉकडाउननंतरही यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. श्रीनगरमध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!