---Advertisement---

सोलापुरात रेल्वेद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करा, खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांची मागणी

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, दि.२० : सोलापुरात दिवसागणिक कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे.अशा परिस्थितीत व्हेंटिलेटर ऑक्‍सिजन आणि बेडचा तुटवडा मोठ्या प्रमाणात बसत आहे. रोज एक हजाराच्यावर कोरोना रुग्ण सापडत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात वाढणारी कोरोना महामारी रोखण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने रेल्वे आयसोलेशन कोच व रेल्वे द्वारे सोलापूरला ओक्सिजन पुरवठा करण्यासाठी खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी रेल्वेचे डीआरएम शैलेश गुप्ता यांची भेट घेत निवेदन दिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!