---Advertisement---

पश्चिम बंगालमधील घटनेबद्दल अक्कलकोट भाजपातर्फे निषेध

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.५ : नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल मधील निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजय प्रस्थापित केला परंतु निवडणुकीनंतर मात्र त्याठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात आहे.
ही बाब चुकीची असून या ठिकाणी घडत असलेल्या घटनांचा आम्ही अक्कलकोट भाजपतर्फे निषेध करत आहोत,असे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड यांनी म्हटले आहे.पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने भाजपने यश मिळवले आहे ते निश्चितच भविष्यासाठी चांगले आहे.

त्या मिळवलेल्या यशात प्रत्येक कार्यकर्त्याचा वाटा आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत,असेही
त्यांनी म्हटले आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपा कार्यकर्तेचे निर्घृण हत्या केल्याबद्दल मुक निषेध करण्यात आला.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष शिवशरण जोजन, तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील,उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे,नगरसेवक महेश हिंडोळे, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, युवा मोर्चा अध्यक्ष रुषिकेश लोणारी, अंकुश चौगुले, शिवशंकर स्वामी, राहुल वाडे, समर्थ होळा, आतिष पवार, रमेश कापसे, माजी सरपंच
दोड्याळे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!