ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटला ५० लाख खर्चून होणार ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प तर दोन दिवसात आणखी ७५ ऑक्सिजन बेडची सोय ! आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

अक्कलकोट, दि.१० : (मारुती बावडे ) अक्कलकोटमध्ये दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे ऑक्सिजन बेडची कमतरता पडत आहे याचा विचार करून विवेकानंद परिवाराने आणखी ७५ बेडसाठी २० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.आणि त्याचे काम देखील जवळपास ९० टक्के पूर्ण झाले असून येत्या दोन दिवसात हे सर्व बेड कार्यान्वित होणार आहेत.त्यामुळे रुग्णांची सोय होणार आहे.त्याशिवाय आमदार निधी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आपत्कालीन निधीतून लवकरच ५० लाखांचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे.

दरवर्षी विवेकानंद परिवारातर्फे सामुदायिक विवाह सोहळा केला जातो मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे झालेला नाही.तोच खर्च कोरोना संकटात खर्च करण्याचा निर्णय विवेकानंद प्रतिष्ठानने घेतला आहे.यापूर्वी मैंदर्गी रोड वरील श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल येथे कोव्हिडं डेडिकेटेड हेल्थ सेंटरमध्ये पंचवीस बेड आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पुढाकाराने कार्यान्वित करण्यात आले होते.परंतु पहिल्याच दिवशी ते फुल्ल झाले. त्यानंतर रुग्णांची अडचण निर्माण झाली होती. त्याचा विचार करून त्याच ठिकाणी आणखी ७५ असे एकूण शंभर बेड ऑक्सिजनचे होणार आहेत.एखादा रुग्ण अत्यावस्थ झाला तर त्यांच्यासाठी दहा बायपँप बेडची व्यवस्था केली जाणार आहे. त्या मशीन देखील उपलब्ध झाले असून त्या देखील येत्या दोन दिवसात प्रत्यक्षात कार्यरत होतील.या मशीन मिळणे कठीण होते परंतु आमदार कल्याणशेट्टी यांच्या विशेष प्रयत्नाने त्या उपलब्ध झाले आहेत.बिगर लक्षणाच्या रुग्णांना सीसीसी सेंटरमध्ये ठेवले जात आहे.ज्यांची ऑक्सिजन पातळी कमी झालेली आहेत त्यांना डेडिकेटेड हेल्थ सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत त्यापेक्षा आणखी अवस्था बिकट झाली तर त्यांना आता बायपँप बेडद्वारे उपचार केले जाणार आहेत.शंभर जर बेड झाले तर त्यासाठी ऑक्सिजनची कमतरता पडेल म्हणून त्यासाठी तूर्तास उस्मानाबाद येथून याची व्यवस्था करण्यात आली आहे.या हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन हा महत्त्वाचा घटक असल्याने येत्या पंधरा दिवसात हवेतून ऑक्सिजन शोषून घेऊन ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प देखील कार्यान्वित केला जाणार आहे.

 

त्यासाठी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित असून स्वतः आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी
आमदार निधीतून २५ लाख रुपये तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आपत्कालीन निधीतून २५ लाख अशा पन्नास लाख रुपयात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.त्यामुळे दररोज साठ सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती अक्कलकोटमधील रुग्णालयातच होणार आहे. त्यामुळे बाहेरच्या ऑक्सिजनची गरज पडणार नाही.आमदार कल्याणशेट्टी यांनी पंधरा दिवसापूर्वी पहिल्यांदा पंचवीस ऑक्सिजन बेडची सोय या हॉस्पिटलमध्ये केली होती. तेव्हापासून दररोज एक तास सर्व कोरोना रुग्णांशी स्वतःहून संवाद साधत आहेत.त्यांची आस्थेने चौकशी करून त्यांना धीर व दिलासा देण्याचे काम ते रोज करत आहेत. याशिवाय रुग्णांचे नातेवाईक डॉक्टर यांचीही समक्ष भेट घेऊन चर्चा करून आलेल्या समस्यावर तोडगा काढण्याचे काम सातत्याने ते करत आहेत. विशेष म्हणजे या डेडिकेटेड कोव्हिडं हेल्थ सेंटरमध्ये सर्व उपचार हे मोफत केले जात आहेत.खाजगी ठिकाणी शासकीय सुविधा उपलब्ध
करून स्वखर्चाने सर्व यंत्रणा उभा करणारे
हे जिल्ह्यातील पहिले हॉस्पिटल आहे.सध्या अठरा ते वीस जणांचा वैद्यकीय पथक त्याठिकाणी आहे रात्रंदिवस ते रुग्णांची काळजी घेत आहे परंतु आता जे वाढीव ७५ बेड्स त्या ठिकाणी होणार आहेत त्यांना लागणारा स्टाफ हा देखील उपलब्ध झालेला आहे तो देखील येत्या दोन दिवसात उपलब्ध होईल.त्याचे आदेश देखील काढण्यात आले आहेत.ही सर्व कामे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून तसेच तहसीलदार अंजली मरोड,अक्कलकोट ग्रामीणचे वैद्यकीय अधीक्षक अशोक राठोड,तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विन करजखेडे यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात येत आहेत.यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांचेही सहकार्य मिळत आहे.आमदार कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून शंभर बेडचे अद्ययावत सर्व सुविधायुक्त आणि तेही मोफत उपचार करणारे हॉस्पिटल झाल्याने अक्कलकोट मतदार संघातील रुग्णांची चांगली सोय होत आहे.त्यामुळे नागरिकांतुन समाधान व्यक्त होत आहे.

विवेकानंद परिवाराची
बांधिलकी कायम

विवेकानंद प्रतिष्ठानने यापूर्वी सामाजिक बांधिलकीतून सामुदायिक विवाह सोहळा, रद्दीतून शिक्षण तसेच आरोग्यविषयक जनजागृती, व्याख्यानमाला यासारखे उपक्रम राबवून समाजसेवा केली आहे.परंतु आता कोरोना संकटात देखील पुढाकार घेत त्यांनी वीस लाख रुपये तालुक्याच्या रुग्णसेवेसाठी दिले आहेत.त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र
कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!