ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कर्जे माफ व्हावीत : शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार

अक्कलकोट, दि. 11 : कोवीड-19 ने गेल्या दोन वर्षात उद्योग, व्यवसाय देशोधाडीला लागले आहे, 2021 साल तरी चांगला जाईल असे वाटत होते, मात्र यंदाही तीच परिस्थिती उद्भवल्याने विविध बँकेकडून काढण्यात आलेल्या वर्गाचे हप्ते भरणे मुश्किल झालेले असल्याने महामंडळ, महिला बचत गट, मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ करण्यात यावेत अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार यांनी केली आहे.

कोरोना परिस्थितीत सध्याच्या लॉकडाउनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे व्यवसायिक, रोजगार यांनी विविध बँकेचे कर्ज काढुन आजवरचे हप्ते वेळेवर भरण्यात आलेली असून गेल्या दोन महिन्यांपासून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पुढील दोन वर्षे तरी परिस्थिती सुधारणा होणे अवघड असल्याने योगेश पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून कर्जे माफ करण्याबाबतची मागणी केलेली आहे.याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे योगेश पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!