---Advertisement---

कर्नाटक; सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, भाजप आमदाराने केला फोन टॅपिंगचा आरोप

Follow Us:
---Advertisement---

बंगळुरू : कर्नाटकात पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपमध्ये अंतर्गत वादाला तोंड फुटलं आहे. हुबळी धारवाड पश्चिमचे भाजपचे आमदार अरविंद बेल्लद यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप केला आहे. तसेच आपल्या हालचालींवर नजर ठेवली जात असल्याचंही म्हणत त्यांनी गृह मंत्री बासवराज बोम्माई यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

आपण बाहेर पडल्यानंतर काही लोकांकडून आपला पाठलाग केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. भाजपच्या एका गटाकडून मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना हटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं समोर येत आहे. या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह तीन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर पोहचले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!