---Advertisement---

17 ऑक्‍टोबरपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, जिल्हाधिकारी,विभागीय आयुक्तांना सतर्कतेच्या सूचना

Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई,दि.१३ : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी.ती म्हणजे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुन्हा एकदा 13 ते 17 ऑक्‍टोबर
या कालावधीत राज्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.यामुळे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.विशेषता: किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सदर कालावधीमध्ये आपल्या पातळीवरून सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्याच्या सूचना तात्काळ देण्यात याव्यात,जेणेकरून मनुष्य हानी टाळता येणे शक्य होईल,अशी सूचना सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!