---Advertisement---

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरमा यांच्यावर गुन्हा दाखल

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली  : गेल्या महिन्या भरापासून आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमध्ये तणाव वाढला आहे.  आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरमा यांच्यावर मिझोराम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हेमंत बिसवा सरमा हे नवनिर्वाचित मुख्यमंत्री असून भाजपने त्यांना संधी दिली आहे.

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरमा विरोधात मिझोराम पोलिसांनी हत्येचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक जॉन नेहलिया यांनी दिली. मिझोराम पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा कोलासिब जिल्ह्यातील वैरेंगटे पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे.

आसाम आणि मिझोरामच्या सीमारेषेवरील कचर भागात काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला. यात आसामच्या पाच पोलिसांचा मृत्यू झाला. ज्या दिवशी गोळीबाराची घटना घडली, त्याच दिवशी आसामचे मुख्यमंत्री आणि इतर सहा अधिकाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय आसामचे ४ वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि प्रशासनातील २ अधिकाऱ्यांसह २०० अज्ञात पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!