---Advertisement---

आधी प्रेमविवाह नंतर महिलेच्या फिर्यादीवर नवऱ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल !

By team
On: January 3, 2024 10:35 AM
Follow Us:
---Advertisement---

पंढरपुर : वृत्तसंस्था

मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करून हीन वागणूक दिली म्हणून सवर्ण जातीच्या व्यक्तीविरुद्ध पीडित मागासवर्गीय व्यक्तीकडून अॅट्रॉसिटी कायद्याखाली फिर्याद दाखल होण्याचे प्रकार नवीन नाहीत. परंतु एका महिलेने आपल्याच नवऱ्यावर अॅट्रॉसिटी कायद्याखाली फिर्याद नोंदवण्याचा अनोखा प्रकार पंढरपुरात घडला आहे. न्यायालयीन इतिहासात बायकोकडून स्वतःच्या नवऱ्यावर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची ही पहिलीच घटना आहे. नवरा बायकोमध्ये बेबनाव झाल्यानंतर त्याचे लोण चक्क अॅट्रॉसिटी कायद्याखाली फिर्याद नोंदवून अटकेपर्यंत पोहोचले आहे.

या अनोख्या खटल्याची माहिती अशी की, फिर्यादी व आरोपी यांचा प्रेमविवाह झाला होता. फिर्यादी दलित समाजातील तर आरोपी सवर्ण समाजातील आहे. आमच्या पोटी दोन मुली जन्माला आल्या. परंतु अलीकडे काही दिवसांपासून नवऱ्याकडून जातीवाचक शिवीगाळ, अपमानास्पद आणि हीन वागणूक दिली जात आहे. नवऱ्याने आपल्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला, अशी फिर्याद पीडित बायकोने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवली. त्यानुसार नवऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी नवऱ्यास अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!