---Advertisement---

लहान मुलांच्या भांडणात महिलेला मारहाण !

By team
On: December 4, 2023 9:52 AM
Follow Us:
---Advertisement---

सांगोला : प्रतिनिधी

भावकीतील लहान मुलांच्या झालेल्या भांडणात दीर भावजईने मिळून महिलेला शिवीगाळ करून चावा घेत कोयत्याने मारून जखमी केले. ही घटना २ डिसेंबर रोजी सकाळी ८ च्या सुमारास गावडेवाडी नं. २ (जवळा), ता. सांगोला येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगोला तालुक्यातील गावडेवाडी सुनंदा मोहन गावडे या जनावराची धार काढून घरात जात असताना मुलगा अण्णासाहेब हा रडत आला. त्यास का रडतो असे विचारले असता त्याने मला दादाने मारले असे सांगितले. यावर सुनंदा गावडे यांनी तू तिकडे गेला कशाला असे म्हणून त्यास घरात घेऊन जात असताना शेजारी राहणारे दीर बाळासाहेब रायाप्पा गावडे, जाऊ सुवर्णा बाळासाहेब गावडे हे दोघेजण आले. यावेळी त्यांनी माझ्या मुलाचे नाव का घेतले असे म्हणून शिवीगाळ करीत जाऊ सुवर्ण हिने लाथा बुक्क्याने मारून उजवे गालावर, उजवे हातावर चावा घेतला तर दीर बाळासाहेब याने शिवीगाळ करून हातातील कोयत्याने डाव्या डोळ्याचे वर मारुन सुनंदा गावडे यांना जखमी केले. याबाबत बाळासाहेबा रायाप्पा गावडे, सुर्वना बाळासाहेब गावडे यांचेविरुध्द पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!