---Advertisement---

महिला लोकप्रतिनिधीविषयी गलिच्छ भाषा बोलून अब्दुल सत्तारांनी त्यांच्या मागास मनोवृत्तीचे दर्शन घडवले – जयंत पाटील

Follow Us:
---Advertisement---

मुंबई दि. ७ नोव्हेंबर – मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह असून महिला लोकप्रतिनिधीविषयी गलिच्छ भाषेत बोलून सत्तार यांनी त्यांच्या मागास मनोवृत्तीचे दर्शन घडवले आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अब्दुल सत्तार यांनी यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त वक्तव्ये केलेली आहेत. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्वरित अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जयंत पाटील यांनी ट्वीट करत केली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!