---Advertisement---

शासकीय कार्यालयात कृषी पर्यवेक्षकाचा खून

By team
On: March 15, 2024 10:44 AM
Follow Us:
---Advertisement---

हिंगोली : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात दिवसेदिवस गुन्हेगारी घटना वाढत असतांना हिंगाेली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका कृषी पर्यवेक्षकाचा खून शासकीय कार्यालयात झाल्याची घटना समाेर आली असून आखाडा बाळापूर येथील कृषी बीज गुणन कार्यालयात ही घटना घडली. या घटनेत कृषी पर्यवेक्षकाचा राजेश कोल्हाळ यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

कृषी पर्यवेक्षक राजेश कोल्हाळ हे त्यांच्या कार्यालयात काम करत हाेते. अचानक त्यांच्यावर चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. मारेक-याने त्यांच्यावर चाकून वार केल्याने त्यांचा भरपूर रक्तस्त्राव झाला. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कार्यालय परिसरात माेठा गाेंधळ निर्माण झाला. शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्याचा चाकूने भोसकून खून झाल्याची माहिती काही नागरिकांनी पाेलिसांना दिली. या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!