---Advertisement---

गुरुपौर्णिमेपूर्वी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अक्कलकोट प्रशासन सक्रिय

By team
On: June 28, 2025 9:15 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दाखल होतात. त्यामुळे शहरात प्रचंड गर्दी होत असते आणि त्यासोबतच वाहतुकीची कोंडी निर्माण होते. ही समस्या यंदा टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच हालचाली सुरू केल्या असून शुक्रवार, २७ जून रोजी प्रशासनाच्यावतीने वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेत विविध ठिकाणी पाहणी करण्यात आली.

या पाहणीत वाहने कोठे थांबवली जातात, कुठे अडथळा निर्माण होतो, आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी कोणती ठिकाणे पार्किंगसाठी उपयुक्त ठरतील, याबाबत सविस्तर चर्चा झाली. मॅप,क्यूआर,कोडद्वारे भाविकांना सोयीस्कर होईल अशा पद्धतीने फ्लेक्स
असे विविध उपाय करण्याचे नियोजन झाले असल्याची माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली. शेख नूरद्दीन बाबा दर्गा, मैंदर्गी रोडवरील हॉस्पिटल, मंगरुळे हायस्कूल परिसरातील जागा निश्चित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले की,वाहतूक व्यवस्थेसंदर्भातील अंतिम निष्कर्ष दोन दिवसांत निश्‍चित केला जाणार असून त्यानंतर तातडीने उपाययोजना राबवण्यात येतील.

सध्या अक्कलकोट शहरातील पार्किंग व्यवस्था अत्यंत अपुरी आहे. वाहनांना रस्त्याच्या कडेला थांबवले जात असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे शहर परिसरातच सुलभ आणि सुरक्षित पार्किंगची व्यवस्था व्हावी, अशी मागणी भाविकांमधून सातत्याने होत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील ही वाहतूक योजना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्या अनुषंगाने विविध पर्यायी ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे.

या पाहणी दौऱ्यात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे, तहसीलदार विनायक मगर, मुख्याधिकारी रमाकांत डाके, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे तसेच संबंधित पोलिस कर्मचारी उपस्थित होते.  गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासन सज्ज झाले असून भाविकांनीही सहकार्य करावे, असे

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

आवाहन प्रशासनाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!