अक्कलकोट रोटरीने घेतली शंभर वृक्ष संगोपनाची जबाबदारी
नव्या पदाधिकाऱ्यांचा पहिल्याच दिवशी विधायक उपक्रम
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात परंतु पुढे हे वृक्ष पाण्याअभावी जळून जातात अशा गोष्टीं न होता वृक्ष संगोपन देखील महत्त्वाचे आहे.ही जबाबदारी ओळखून अक्कलकोट रोटरी क्लबने शहरातील शंभर वृक्ष लागवडीच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे.रोटरी क्लब अक्कलकोट तर्फे नूतन रोटरी वर्षाच्या प्रथमदिनी डॉक्टर्सडे, चार्टर्ड अकाउंट डे व कृषीदिना प्रित्यर्थ शंभर देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.यामध्ये वड, पिंपळ, लिंब, करंज आदी देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.हे वृक्षारोपण प्रमिला पार्क, ए वन चौक परिसर ,सोलापूर रोड इत्यादी ठिकाणी करण्यात आले. हा कार्यक्रम रोटरी क्लब व बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला.
दहा ते बारा फूट उंच असलेली ही झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचे रोटरी क्लबने ठरवले आहे व याचे पालकत्व विविध संस्था व नागरिकांना देण्यात आलेले आहे. यावेळी बँक ऑफ इंडिया व रोटरी क्लब यांनी या वृक्षांसाठी ट्री गार्डची सोय केली.या वृक्षांना उन्हाळ्यामध्ये पाणी देऊन संगोपन करण्याची जबाबदारी रोटरी क्लबने स्वीकारलेली आहे. या कार्यक्रमास रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. विपुल शहा, सचिव डॉ. प्रशांत वाली, कोषाध्यक्ष डॉ.प्रमोद सुतार, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक कुटे, एजाज़ मुतवल्ली, दिनेश पटेल, निनाद शहा, नितिन पाटील,शशिकांत लिंबितोट, ऍड. सुनील बोराळकर,सतीश शिंदे,आनंद गंदगे , मनोज काटगाव , अनिल तोतला , दत्ता कटारे , जितेंद्र जाजू,संजय नंदर्गी आदी उपस्थित होते.