---Advertisement---

बार्शी येथे अनोळखी महिलेचा पंधरा दिवसांपूर्वी खून

By team
On: July 2, 2024 9:51 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात खुनाच्या घटना घडत असतांना नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे अनोळखी महिलेचा पंधरा दिवसांपूर्वी खून करून तिचा मृतदेह साडीमध्ये बांधून उसाच्या शेतात टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार बार्शी-येरमाळा मार्गावरील पाथरी शिवारात सोमवारी (दि. 1) उघडकीस आला. खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला. मृतदेह सडला असल्याने घटनास्थळावर दुर्गंधी पसरली होती.

तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मिठू जगदाळे व सोलापुरातील फोरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. मृत महिलेचे वय 28 ते 30 दरम्यान असावे. मृतदेहाची फक्त कवटी शिल्लक राहिली आहे. मृतदेह हिंस्त्र प्राण्यांनी खावून टाकला आहे. सोमवारी सकाळी पाथरीतील शेतकरी प्रमोद गायकवाड हे शेतात खत टाकण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पोलीस पाटील शंकर गायकवाड यांनी तालुका पोलीस ठाण्यात घटनेची फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास गावातील प्रमोद गायकवाड यांचा फोन आला. त्यांनी त्यांच्या शेतात एक सडलेले प्रेत दिसल्याचे सांगितले. त्यानंतर खात्री करण्यासाठी गायकवाड यांच्या शेतात गेलो. तेव्हा तिथे छिन्नविछिन्न व सडलेला मृतदेह होता. वैद्यकीय अधिकारी अशोक ढगे व त्यांच्या पथकाने घटनास्थळावरच शवविच्छेदन केले. महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जगदाळे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!