---Advertisement---

अक्कलकोटला भरला आनंद मेळा ; बालगोपाळांसाठी मनोरंजनाची पर्वणी

By team
On: June 10, 2025 9:25 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : मारुती बावडे

अक्कलकोट शहरातील जुना पावर हाऊस येथे सध्या रंगतदार आणि धमालमस्तीने भरलेला स्वामी समर्थ ॲम्युझमेंट पार्क अर्थात आनंद मेळा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीतील अखेरचे दिवस गोड आठवणीत घालण्यासाठी हा मेळा खऱ्या अर्थाने मनोरंजनाची पर्वणी ठरत आहे. शहर व ग्रामीण भागातील कुटुंबे आपल्या चिमुकल्यांसह मेळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होत असून संध्याकाळी तेथे एक वेगळीच उत्सवमयी झळाळी पाहायला मिळते. बच्चेकंपनीसाठी खास आकर्षण ठरत आहेत. ते म्हणजे ब्रेक डान्स, पाळणा, आकाशी पाळणा, टोरा टोरा, ड्रॅगन ट्रेन, कोलंबस, वॉटर बोर्ड, मिकी माऊस, क्रॉस व्हील, पिकी ट्रेन, छोटी कोलंबस, जम्पिंग जपांग, प्लेन राईड्स आणि जीप राईड्स.

ही सर्व खेळणी आणि झुल्यांची रेलचेल मुलांना एका वेगळ्या कल्पनाविलासाच्या जगात घेऊन जात आहे. मेळा संध्याकाळी ५:३० ते रात्री ११:०० या वेळेत खुले असून, उजळलेल्या लाइट्सच्या प्रकाशात आणि खेळण्यांच्या गोंगाटात सर्व वयोगटातील नागरिक हरखून जाताना दिसत आहेत. यंदा शाळा सुरू होण्यापूर्वीच हा मेळा भरवल्याने पालकही आनंदाने आपल्या मुलांना घेऊन येथे येत आहेत.या आनंदमय अनुभवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेळा आयोजक जब्बार अमीरसाब काझी यांनी केले आहे.
१० जुलै पर्यंत चालणारा हा मेळा केवळ करमणुकीचेच नव्हे, तर कुटुंबीयांसाठी एकत्र येण्याचे आणि आनंद साजरा करण्याचे माध्यम बनला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!