---Advertisement---

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी गांधींच्या दिसण्यावरून केली टीका, जर तुम्हाला तुमचा लूक बदलायचाच आहे तर तो….

Follow Us:
---Advertisement---

अहमदाबाद : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी अहमदाबाद येथे मंगळवारी प्रचार सभेत त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. काँग्रेसचे खासदार व माजी अध्यक्ष राहुल गांधीयांच्या दिसण्यावरून केलेल्या टीकेमुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. राहुल गांधी हे सध्या इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेन याच्या सारखे दिसत असल्याचे एका प्रचारसभेत म्हटले आहे.

”आम्हाला राहुल गांधीं यांच्या नव्या लूकचा काहीही त्रास नाही. मात्र जर तुम्हाला तुमचा लूक बदलायचाच आहे तर तो वल्लभभाई पटेल किंवा जवाहरलाल नेहरुं सारखा करा. त्यापेक्षा महात्मा गांधीजीं सारखे दिसला असतात तर अजूनही चांगले झाले असते. पण सध्या तुम्ही सद्दाम हुसेन सारखे का दिसायला लागला आहात?” असे वादग्रस्त वक्तव्य हिमंत बिस्वा सरमा यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!