ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल ; महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक…

नागपूर, दि. १८ : महाराष्ट्राचा लोकायुक्त कायदा झाला पाहिजे असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सांगत होते. अण्णा हजारे समितीने दिलेला रिपोर्ट शासनाने स्वीकारला असून नवीन लोकायुक्त कायदा तयार करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली…

चपळगाव ग्रामपंचायतीने दिला दिव्यांगांना न्याय ; उपयोगी वस्तू भेट देऊन निर्माण केला रोजगार

अक्कलकोट, दि.१७ : समाजात अपंग हा घटक नेहमी दुर्लक्षित राहतो या भावनेतूनच चपळगाव ग्रामपंचायतीने त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ देत ग्रामपंचायत निधीतून दिव्यांगांना उपयोगी वस्तू भेट देऊन त्यांना जगण्यासाठी पंख दिले आहेत. त्यांच्या…

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यात तगडा बंदोबस्त, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत…

अक्कलकोट, दि.१७ : अक्कलकोट तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अक्कलकोट तालुक्यात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सलगर गावाला अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, पोलीस उपअधीक्षक राजेंद्रसिंह…

हे चालणं हे एक प्रतिकात्मक, आजपर्यंत ज्यांनी आपल्याला डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ…

मुंबई : मुंबईमध्ये निघालेल्या हल्लाबोल मोर्चामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील सहभागी झाले होते. ते काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या मोर्चासाठी जमलेल्या महाराष्ट्र प्रेमींना उद्देशून उद्धव ठाकरे यांनी केलेले…

देवी-देवता, संत, वारकर्‍यांना शिव्या घालणार्‍या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती नसलेल्या,…

मुंबई, 17 : जे लोक देवी-देवतांना शिव्या देतात, जे संतांना शिव्या देतात, जे वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, ज्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला, तो कोणत्या वर्षी झाला, हे माहिती नाही, अशा मंडळींचा आजचा नॅनो मोर्चा…

सलगर जिल्हा परिषद शाळेने केली विद्यार्थ्याला वैद्यकीय मदत, सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक

अक्कलकोट, दि.१६: जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर (ता.अक्कलकोट ) शाळेच्या वतीने दोन विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली.त्यांच्या या सामाजिक बांधीलकीबद्दल कौतुक होत आहे. कु. अवनी अतुल नकाते (इयत्ता ४ थी) आणि कु. निरज अतुल नकाते (इयत्ता…

अक्कलकोट – नळदुर्ग रस्त्यातील शेतकऱ्यांचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा ; जमीन संपादित होऊनही मिळेना…

अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट ते नळदुर्ग रस्त्यात जमीन संपादित होऊनही मोबदला मिळत नसल्याच्या निषेधार्थ या भागातील काही शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला आहे.याबाबतची निवेदने सोलापूरच्या आणि उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली…

केंद्रीय रस्ते विकास निधीतून मंगळवेढ्यासाठी १७ कोटी मंजूर – आ. समाधान आवताडे

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते विकास व पायाभूत सोयीसुविधामधून १७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत अशी माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. हुलजंती ते नंदेश्वर या…

दसरा मेळाव्यासाठी १० कोटी रुपये खर्चून महामंडळाच्या बसेस बुकींग केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचा शिंदे…

मुंबई : शिवसेनेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच दोन दसरा मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेने मुंबईतील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेतला होता. यासाठी गर्दी जमवण्याची जबाबदारी सर्व आमदारांवर सोपवण्यात आली…

मविआच्या मोर्चा विरोधात भाजपाचे आंदोलन म्हणजे ”चोराच्या उलट्या बोंबा’’ – नाना पटोले

मुंबई : महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र विकास आघाडीच्या 17 तारखेच्या हल्लाबोल मोर्चाने भारतीय जनता पक्षाची झोप उडाली आहे. जनतेत असलेला संताप या मोर्चातून व्यक्त होत असल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोर्चाच्या…
Don`t copy text!