---Advertisement---

नात्याला काळिमा : तब्बल आठ वर्ष आजोबाने केले नातसोबत चुकीचे कृत्य !

By team
On: December 1, 2023 8:34 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना अशीच एक संतापजनक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. शाळेच्या निमित्तानं माहेरी ठेवलेल्या आपल्या मुलीवर आपल्या वडिलांनीच अत्याचार केल्याची तक्रार विवाहित मुलीने पोलिस ठाण्यात दिली आहे. हा धक्कादायक प्रकार २०१५ ते २०२२ या आठ वर्षांत अनेकदा घडल्याचे पीडितेने म्हटले असून, यामुळे आपली मुलगी मनोरुग्ण बनल्याची व्यथा फिर्यादीत व्यक्त केली आहे. या प्रकरणी आरोपीवर भा.दं.वि. ३७६, बाल लैंगिक छळाचा (पोक्सो) गुन्हा नोंदला आहे.

फिर्यादी आपले पती, एक मुलगी व मुलगा असे जिल्ह्यातील एका गावात सासरी राहत होते. मोठी मुलगी चार-पाच वर्षांची असल्यापासून आई-वडिलांकडे राहून तेथेच शिक्षण घेत होती. ती इयत्ता ८वीपर्यंत अभ्यासात कुशाग्र होती. इयत्ता ९वीनंतर ती एकलकोंडी बनली. मुलीला विश्वासात घेऊन तिला विचारणा केली असता तिने आजोबानं चार ते पाचवेळा केलेल्या अत्याचाराबद्दल सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!