---Advertisement---

बार्शीत शोभेच्या दारूच्या कारखान्याला आग; पाच जणांचा मृत्यू 

Follow Us:
---Advertisement---

बार्शीत शोभेच्या दारूच्या कारखान्याला आग; पाच जणांचा मृत्यू

बार्शी :- बार्शी तालुक्यातील पांगरी -शिराळे मार्गावर असलेल्या शोभेच्या दारुच्या कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत या कारखान्यामधील स्फोटके सुरूच होती. पांगरी येथील इसमाचा हा कारखाना आहे. कारखाना हा जळून खाक झाला असुन कारखान्यामध्ये किती जण कामाला होते याचा शोध सुरू आहे. यामध्ये अनेक कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Watch Our Latest Video

बार्शी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनाही दाखल झाले आहेत. मात्र कारखाण्यातून आगीचे लोट मोठ्या प्रमाणात येत असल्याने बचाव कार्यास अडचणी निर्माण होत आहेत.

दुपारी ४ वाजेपर्यंत ५ मृतदेह कारखान्यातून बाहेर काढण्यात आले होते.तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!