ध्यास विश्वसार्ह बातमीचा

निवडणुकीच्या निकालापूर्वी देशात दुधाचे दर महागले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून देशात जीवनावश्यक वस्तूंचे दर नियमित वाढत असताना आज पुन्हा एकदा जनतेला महागाईचा सामना करावा लागणार आहे. आजपासून दि.३ जून अमूल दूध विक्री दरात २ रुपयांनी वाढ झाली. या पाठोपाठच मदर डेअरने देखील दूध विक्री दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

लोकसभा निवडणूक संपताच देशातील दोन मोठ्या दूध उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. प्रथम अमूलने दुधाच्या दरात लिटरमागे विक्री दरात दोन रुपयांनी वाढ केली. अवघ्या 12 तासांनंतर मदर डेअरीनेही आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, मदर डेअरीने 3 जूनपासून ताज्या पाऊच दुधाचे (सर्व प्रकारचे) दर प्रति लिटर २ रुपयांनी वाढवले ​​आहेत.

याआधी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने सांगितले होते की, दुधाचा एकूण खर्च आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ पाहता सोमवारपासून सर्व प्रकारच्या अमूल दुधाच्या किमतीत २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील सर्व बाजारपेठांमध्ये अमूल दुधाच्या पाऊचच्या किंमतीत प्रति लिटर २ रुपयांनी वाढ होणार आहे.

जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक जयन मेहता यांनी सांगितले की, अमूल ब्रँड अंतर्गत सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये GCNMF ने दुधाच्या दरात शेवटची वाढ केली होती. शेतकऱ्यांचा वाढलेला उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी ही वाढ आवश्यक असल्याचे मेहता यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!