---Advertisement---

मोठी बातमी : भाजप विधानपरिषदेच्या तीन जागा लढविणार

By team
On: June 3, 2024 1:00 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या दि.४ रोजी येत आहे. त्यापूर्वी भाजप विधानपरिषदेच्या तीन जागा लढविणार आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज तीन उमेदवारांची नावे जाहीर केली.

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे हे निवडणूक लढवणार आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघातून किरण रवींद्र शेलार हे उमेदवार असणार आहेत. तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदान होणार असून १ जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) याआधीच अभिजित पानसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!