---Advertisement---

अक्कलकोट मतदार संघात 26 पैकी 19 ग्रामपंचायतीवर भाजपने केला दावा

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि. 20 : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील नुकत्याच झालेल्या 26 ग्रामपंचायतीचे मतमोजणी होवून निकाल हाती आले. या 26 ग्रामपंचायतीपैकी 19 ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टी समर्थकांनी विजय संपादन केल्याचा दावा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड यांनी केला आहे. तसेच तटस्थ असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याशी संपर्कात असून लवकरच भाजपाप्रणित ग्रामपंचायती होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, भाजपा शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, नगरसेवक महेश हिंडोळे, प्रदिप पाटील, पं.स.सदस्य राजकुमार बंदीछोडे, रमेश कापसे, शिवलाल राठोड, नागराज कुंभार, राम पारतनाळे, सिध्दु तडवळ या मान्यवरांच्या उपस्थितीत तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेवून सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपा प्रणित असल्याचा दावा केला आहे. नुकत्याचा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपा कार्यालयास भेट देवून सत्कार स्विकारल्याचे भाजपा शहर अध्यक्ष शिवशरण जोजन यांनी सांगितले.

अक्कलकोट तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील भाजपाप्रणित ग्रामपंचायती सुलतानपूर, अरळी, दर्शनाळ, नाविंदगी, सदलापूर, शिरवळ, शिरवळवाडी, बोरगाव दे., अंकलगे, रुद्देवाडी, कोन्हाळी, दहिटणेवाडी, हालचिंचोळी, घोळसगांव, खानापूर व पालापूर असल्याचा दावा पत्रकार परिषदेत तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड यांनी केला. तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव, गंगेवाडी, तोगराळी ही गावे भाजपा समर्थक गटाने दोन गावे तटस्थ असल्याचे सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!