---Advertisement---

भाजप नेत्याची जीभ घसरली : थेट ठाकरेंसह पवारांवर जहरी टीका

By team
On: July 17, 2024 3:41 PM
Follow Us:
---Advertisement---

जालना : वृत्तसंस्था

राज्यातील गलिच्छ राजकारणाचा प्रत्यय नेहमीच येत असतो. आजही भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांची महाविकास आघाडीतील नेते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांवर अत्यंत जहरी टीका करताना लोणीकर यांची जीभ घसरली. यावेळी लोणीकर यांनी शरद पवार यांचा बेईमान नेता असा उल्लेख केला. इतकेच नाही तर शरद पवार यांचा उल्लेख शकुनी मामा असा उल्लेख केला आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही लोणीकर यांनी खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. त्याचे पडसाद उमटले आहेत.

जालना जिल्ह्यातील परतूर येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली. मराठा समाजाला फसवणारा सर्वात मोठा बेमान नेता कोण असेल तर शरद पवार आहेत. त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. शरद पवार यांच्यासमोर शकुनी मामाही फेल आहे. शरद पवार जिवंत आहेत ना..? काय हाल आहेत..! एका हाताने करायचे आणि एका हाताने फेडायचे, अशी टीका बबनराव लोणीकर यांनी केली.

आपल्या सरकारने मराठा आरक्षण दिलं. त्याची अंमलबजावणी सुरू झाली. मराठा आरक्षणाचा फायदा मुलांना शिक्षणात होऊ लागला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या पांढऱ्या पायाच्या सरकारमुळे आरक्षण गेले. सुप्रीम कोर्टात जेव्हा आरक्षणाची केस होती त्यावेळेस आघाडी सरकारने कपिल सिब्बल वकील दिला. अतिरेक्यांचा जामीन घेणारा, राम मंदिराला विरोध करणारा वकील दिला आणि त्यांनी आरक्षण घालवले. वकील कोणी दिला..? उद्धव ठाकरेंची आणि त्यांची ओळख होती का..? वकील शरद पवार यांनी दिला आणि कपिल सिब्बलमुळे मराठा आरक्षण गेले, असा दावा करतानाच ओबीसींचे ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष हे होत होते. परंतु ओबीसींचे आरक्षणही आरक्षण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमुळे गेले, असा आरोपही बबनराव लोणीकर यांनी केला.
काँग्रेसवाले बेईमान आहेत, राष्ट्रवादीवाले हरामखोर आहेत. हे साले शिवसेनावाले बेबनाव करत आहेत. या लोकांच्या बहकाव्यात येऊ नका. हे लोक ओबीसी आणि मराठा भांडण लावत आहेत, असं सांगतानाच मोदीजी सबका साथ, सबका विकास करत आहेत. देशाच्या पंतप्रधानाबद्दल स्वाभिमान बाळगा, असं बबनराव लोणीकर म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!