---Advertisement---

वटवृक्ष मंदिरास बॉम्ब शोध पथकाची भेट, ए.पी.आय. प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर, परिसरात तपासणी मोहीम

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सोलापूर ग्रामीण बॉम्ब शोध पथकाने भेट देऊन मंदिर व परिसराची पाहणी करून तपासणी केली. ए.पी.आय. प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी मोहीम पार पडली. या कामी त्यांना पी.आय. अनंत कुलकर्णी, धनराज शिंदे, पोलीस हवालदार सुरेश वाघमारे, पोलीस प्रशांत जाधव, महेश क्षीरसागर, आदींनी सहकार्य केले.

या प्रसंगी बोलताना ए.पी.आय.प्रदीप पवार यांनी कोरोना लॉकडाउनच्या दीर्घ कालावधीनंतर मंदिर उघडल्याने आता मंदिरातील भाविकांची गर्दी हळू हळू वाढत आहे. या पार्श्वभूमीवर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर व परिसरात सावधगिरी बाळगणे हे व त्याबाबत संबंधितांना मार्गदर्शन करणे हे पोलीस खात्याची जबाबदारी आहे. याकरिता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास बॉम्ब शोध पथकासह भेट देऊन पाहणी व तपासणी केली असल्याचे मनोगत व्यक्त केले.

यावेळी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी ए.पी.आय. प्रदीप पवार व सहकाऱ्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र,प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.  यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, विपुल जाधव, अविनाश क्षीरसागर, इत्यादी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!