वटवृक्ष मंदिरातील गुरुपौर्णिमा संपन्न होणार साध्या पद्धतीने; सलग दुसऱ्या वर्षीही जाणवणार भाविकांची अनुपस्थिती

अक्कलकोट – गुरूंचे गुरु, सद्गुरूंचे गुरु, ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दत्तसंप्रदायातील माहितीमुळे श्री गुरु स्वामी समर्थांवर लाखो स्वामी भक्तांची निस्सीम श्रद्धा आहे.  त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षी साजरा होणाऱ्या गुरुपौर्णिमेस अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अशा या गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून दरवर्षी लाखो स्वामीभक्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींच्या … Read more

शिवयोग धाम येथील गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम रद्द

सोलापूर – गुरुपौर्णिमेनिमित्त शेळगी येथील शिवयोग धाम सेवा समितीच्यावतीने साजरा करण्यात येणारा कार्यक्रम कोव्हीड महामारीमुळे रद्द करण्यात आला आहे.  श्री शिवयोग धाम सेवा समितीच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने शिवयोग धाम सेवा समिती शेळगीच्यावतीने गुरुपौर्णिमा व डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो.तसेच समाजाच्या कल्याणासाठी व विश्वशांतीसाठी धार्मिक कार्यक्रम, पूजा, महाप्रसाद … Read more

आषाढी एकादशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडुन मराठीत शुभेच्छा

दिल्ली : आषाढी एकादशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्विट करून शुभेच्छा दिली आहे. “आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा सर्वांना उदंड आनंदाने चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया” असा खास शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिले आहेत. आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले … Read more

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे

पंढरपूर दि. 20 – पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्मंत्र्यांचा … Read more

मानाच्या पालख्यांचे वाखरीत आगमन, प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्वागत

पंढरपूर, दि.19: आषाढी एकादशीसाठी आज मानाच्या पालख्यांचे वाखरी येथे आगमन झाले. मानाच्या पालख्यांचे स्वागत जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तर विठ्ठल-रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार, कोरोनाच्या नियमांचे पालन करत आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मानाच्या पालख्यांचे आगमन वाखरी पालखी तळावर झाले. … Read more

आषाढी एकादशीनिमित्त उद्या रंगणार अभंगमैफल ; गायक दीपक कलढोणे यांचा ‘तुकोबांची अभंगवाणी’ ऑनलाइन कार्यक्रम

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त मंगळवार दि. २० जुलै सकाळी ८ वाजता दुर्वांकुर प्रस्तुत ‘तुकोबांची अभंगवाणी’ हा कार्यक्रम कोरोनाच्या काळामुळे ऑनलाईन माध्यमातून सादर होणार आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य सुप्रसिद्ध गायक, संगीतकार दीपक कलढोणे आणि सहकारी आपली गायन सेवा विठूरखुमाईचरणी अर्पण करणार आहेत. भक्तीसंगीत आणि संत साहित्याच्या प्रचाराने सामाजिक मने संवेदनशील व्हावीत आणि सामाजिक ऐक्य … Read more

‘ग्यानबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमले कौंडण्यपूर, महामारी टळो ; सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभो ; पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घातले विठ्ठलाला साकडे

अमरावती, दि. १८ : शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना व गोरगरीब जनतेला सुखी ठेव, कोरोना महामारीचे संकट नष्ट होऊ दे, सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभू दे, चांगला पाऊस येऊन सगळीकडे शेते पिकू दे, महाराष्ट्र भूमीत समृद्धी निर्माण होऊ दे…असे साकडे महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज श्री विठ्ठलाला घातले. आषाढी वारीसाठी कौंडण्यपूरहून पंढरपूरला मानाची … Read more

आषाढी एकादशीला महापूजेसाठी वर्ध्याचे केशव कोलते ठरले मानाचे वारकरी, 20 वर्षांपासून विठ्ठल मंदिरात देत आहेत वीणा वादनाची सेवा…

पंढरपूर : आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांसोबत श्री विठ्ठल – रुक्‍मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान यंदा वर्ध्यातील वारकऱ्याला मिळाला आहे. ७१ वर्षीय केशव शिवदास कोलते हे येत्या 20 जूलैला सपत्नीक पूजा करतील. गेल्या २० वर्षापासून कोलते हे मंदिरात वीणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. काेविड 19 चा प्रार्दुभाव लक्षात घेता घेऊन यंदा शासनाने पायी वारीवर बंदी घातली … Read more

मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहोळ्यासाठी शिवशाही बस सज्ज:सोमवारी पंढरपूरकडे होणार रवाना – परिवहनमंत्री, ॲड. अनिल परब यांच्याकडून वारकऱ्यांना शुभेच्छा

मुंबई,दि. १७ कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अवघ्या मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत सोमवार,दि.१९ जुलै रोजी राज्यातील १० मानाच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्थान करणार आहेत. वारकऱ्यांचा पालखी प्रस्थान सोहळा नेत्रदिपक व्हावा यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाही बस सज्ज झाल्या आहेत. वारकऱ्यांच्या प्रस्थान सोहोळ्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी शुभेच्छा दिल्या असून मानाच्या पालख्या … Read more

जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांना मान्यता; आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करुन देणार -उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

पुणे, दि. 16 : जेजुरी तीर्थक्षेत्र विकासासाठी तयार करण्यात आलेल्या 349 कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यातील जतन व संवर्धन, परिसर व्यवस्थापन, जलव्यवस्थापन आदी विकासकामांसाठी मान्यता देण्यात आली, तसेच पहिल्या टप्प्यांतील विकास कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या … Read more

Don`t copy text!