आषाढी वारी कालावधीत पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीस बंदी, जिल्हा प्रशासनाचे आदेश जारी

सोलापूर, दि.15 : आषाढी वारी कालावधीमध्ये पंढरपूर शहरातील मांस, मटण, मासे, मद्य विक्री व प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी भारत वाघमारे यांनी जारी केले आहेत. आदेशात म्हटल्यानुसार पंढरपूर शहरामध्ये 19 ते 24 जुलै 2021 या कालावधीमध्ये आषाढी वारी होत असून वारीमध्ये भाविक येत असतात. शहरातील कायदा व सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी 19 … Read more

गणपती उत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार: दि.१६ जुलैपासून आरक्षण सुरु – परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती

मुंबई:दि.१४ कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून दि.४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. याचे दि.१६ जुलै २०२१ पासून आरक्षणाला … Read more

अक्कलकोट येथील ख्वाजा दाऊद दर्गाचा उरूस कोरोनामुळे रद्द

अक्कलकोट, दि.१२ : अक्कलकोट शहरातील मुजावर गल्ली येथील ग्रामदैवत हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाचा यंदाचा दि.१४, १५, १६ जुलै रोजी होणारा उरूस कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष एजाज मुतवल्ली यांनी दिली. या तीनही दिवशी दर्गाह भाविकांसाठी बंद असल्याने भाविकांनी दर्गा परिसरात नैवेद्य घेऊन न येता आपल्या घरीच प्रार्थना … Read more

अयोध्या जमीन घोटाळ्यात आरएसएसचा ॲक्शन मूड ; चंपतराय, अनिल मिश्रांना मंदिर ट्रस्टच्या कामापासून ठेवण्याचा हालचाली

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या जमीन खरेदीतील घोटाळ्याचा आरोपानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ऍक्शन मूडमध्ये आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपतराय आणि अनिल मिश्रा या दोघांना ट्रस्टच्या कामापासून दूर ठेवण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत. सहकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी ही गुप्त मोहीम हाती घेतली असून यासाठी ते अयोध्येत हजेरी लावणार आहेत अशी … Read more

आषाढी वारी प्रथा, परंपरेनुसार होणार – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

सोलापूर, दि.5 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी सांप्रदायाची परंपरा कायम ठेवून राज्यातील 10 पालखी सोहळ्यांना परवानगी दिली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरुपात वारीच्या प्रथा, परंपरेनुसारच होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आषाढी वारीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा … Read more

पंढरपूर परिसरात 17 ते 25 जुलै दरम्यान संचारबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

सोलापूर : राज्यात कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरल असलं तरी धोका मात्र कायम आहे. यामुळे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसह आसपासच्या गावात 17 ते 25 जुलै 2021 पर्यंत संचार बंदीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. ग्रामीण पोलिसांनी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे … Read more

कोरोनामुळे हजरत पीर सैय्यद बाहोद्दीन वली उरुस रद्द

दुधनी  : येथील हजारो हिंदू-मुस्लीम भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या, हजरत पीर सैय्यद बाहोद्दीन वली यांचे ऊरुस यंदा करोना विषाणू प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती हजरत पीर सैय्यद बाहोद्दीन वली दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष मौलाली मुजावर यांनी दिली आहे. या संदर्भात अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासकीय … Read more

गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडुन मार्गदर्शंक तत्वे जाहीर

मुंबई: कोरोनाचे संकट लक्षात घेत राज्य सरकारने आज गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्तीच्या उंचीची मर्यादा ४ फुटांची ठेवण्यात आली असून घरगुती गणपतीची मूर्ती ही २ फुटांची असावी अशी मर्यादा राज्यसरकारने घालून दिली आहे. यंदा गणेशोत्सवासाठी गणपतींच्या मूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी विनंती गणेशोत्सव मंडळांनी केली होती. गणेशोत्सवाला अवघ्या दोन महिन्यांचा … Read more

पायी वारीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, सुनावणीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे पायी वारी काढण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. या पार्श्वभूमीवर पायी वारीला परवानगी दिली जावी, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. संत नामदेव संस्थान नरसी नामदेव यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. २५० पालख्यांना पायी वारी काढण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात … Read more

२०० वर्षांपासून अविरत ऑक्सिजन पुरविणाऱ्या पिंपळाच्या झाडाची “हेरिटेज ट्री”च्या यादीत समावेश करण्याची मागणी

दुधनी : कोरोना काळात सर्वात चर्चेचा विषय बनला होता तो, ऑक्सिजनचा…! ऑक्सिजन अभावी शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या नंतर हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट राज्यातील सर्वच जिल्ह्यामधील रुग्णालयांमध्ये उभारण्यास सुरुवात झाली. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी वृक्षारोपण करण्यावर अधिक भर देण्यात आले. अधिक प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या झाडांमध्ये वड, पिंपळ, कडूलिंब, तुळशी झाडांचा समावेश … Read more

Don`t copy text!