लोककल्याणकारी योजनांचा तिजोरीवर बोजा; ‘लाडकी बहीण’वर ताशेरे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात महाराष्ट्राच्या आर्थिक आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली असून, राज्यातील ‘लाडकी बहीण’सारख्या मोठ्या लोककल्याणकारी योजनांवर थेट ताशेरे ओढण्यात आले आहेत. हा अहवाल देश व राज्यांच्या अर्थव्यवस्थेचा आरसा मानला जातो. मात्र, यंदाच्या अहवालात महाराष्ट्राच्या वाढत्या महसुली तुटीवर विशेष भर देण्यात आला आहे. आर्थिक … Read more

सुनेत्रा पवारांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद द्या ; नेत्यांची मागणी !

बारामती : वृत्तसंस्था महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी चितेला मुखाग्नी दिला. अंत्यविधीच्या वेळी उपस्थित हजारो समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. पत्नी सुनेत्रा पवार यांनी पतीच्या पार्थिवावर गंगाजल अर्पण करून अंतिम निरोप दिला. या … Read more

भावनांचा पूर : वाल्मीक कराडच्या मुलाच्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असतानाच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. “आता कोण भल्या पहाटे उठून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी पळणार? आता ‘DADA is love’ आम्ही कोणाला म्हणणार?” अशा भावनिक शब्दांनी भरलेली ही पोस्ट अनेकांच्या काळजाला चटका लावणारी ठरत असल्याचा दावा केला … Read more

वडिलांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करताना मुलीचा अंत; पिंकी मालीची हृदयद्रावक कहाणी

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील फ्लाइट अटेंडंट पिंकी माली हिचाही दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या पाच वर्षांपासून चार्टर्ड फ्लाइटमध्ये कार्यरत असलेली पिंकी आपल्या कर्तव्यावर असतानाच काळाच्या पडद्याआड गेल्याने तिच्या कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. बारामती येथे बुधवारी सकाळी अजित पवार यांच्या प्रचारसभांसाठी … Read more

अजित पवारांना अखेरचा निरोप; काटेवाडीतून निघाली अंत्ययात्रा

बारामती : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी काटेवाडी येथील निवासस्थानी ठेवण्यात आले असून, कुटुंबीय, पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने अंत्यदर्शनासाठी उपस्थित आहेत. अंत्यदर्शनानंतर अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अंत्यसंस्कारांना संपूर्ण मंत्रिमंडळ … Read more

‘दादांना भेटायला जाऊया…’ अपघाताची बातमी कळताच आई अस्वस्थ; पवारांच्या फार्महाऊसवरील हृदयद्रावक क्षण

पुणे : वृत्तसंस्था  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर आता अजित पवारांच्या बारामतीतील फार्महाऊसवरून समोर आलेली माहिती मनाला चटका लावणारी ठरत आहे. फार्महाऊसवरील व्यवस्थापक संपत धायगुडे यांनी अजित पवारांच्या आईंशी संबंधित हृदयद्रावक प्रसंग उघड केला आहे. संपत … Read more

शेवटच्या श्वासापर्यंत राज्याचाच विचार; अखेरच्या प्रवासापूर्वी अजित पवारांनी उरकली कामांची यादी

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा कणखर, कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. मुंबईहून बारामतीकडे येत असताना बारामती विमानतळावर लँडिंगच्या काही मिनिटे आधीच भीषण अपघात झाला. अपघात इतका भयावह होता की विमानाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. या दुर्दैवी … Read more

एक नेता आणि चार कर्तव्यवीर… अजित पवारांच्या अपघाताने महाराष्ट्र सुन्न

बारामती : वृत्तसंस्था बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अजित पवार यांचे सहकारी विदीप जाधव, पिंकी माळी तसेच विमानाचे पायलट कॅप्टन सुमित कापूक आणि सह-पायलट शांभवी पाठक यांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण … Read more

माझा एक दिलदार आणि दमदार मित्र मला सोडून गेला ; मुख्यमंत्री भावूक !

मुंबई : वृत्तसंस्था विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दु:खद निधन झाल्याची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेच्या प्रश्नांसाठी सतत लढणारे, राज्याच्या कानाकोपऱ्याची सखोल जाण असलेले लोकनेते आज काळाच्या पडद्याआड गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करताना म्हटले की, “अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. जनसामान्यांमध्ये … Read more

उपमुख्यमंत्री पवार यांच्या निधनावर शिवसेना-मित्रपक्षाची आदरांजली

कासेगाव : प्रतिनिधी  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची दुःखद बातमी पसरल्याने सर्वत्र दुखवटा व्यक्त केला जातोय. राज्यात सर्वत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत ही अपघाती घटना घडल्यानं राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्षाचे बुधवारचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे बोरामणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार धनेश अचलारे यांनी शोकसभेत सांगितले. … Read more