सोलापूरच्या आकाशाला गती; मुंबई विमानसेवा रोज, तिरुपती सेवा लवकरच

सोलापूर : वृत्तसंस्था  मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली सोलापुरातून विमानसेवा आता गती घेत असून, येत्या आठवडाभरात सोलापूर–तिरुपती विमानसेवा सुरू होणार आहे. त्याबाबत प्रशासनाने तयारी सुरू केली असून, ही माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. दरम्यान, सोलापूर–मुंबई विमानसेवा आता आठवड्यातील सातही दिवस सुरू होणार असल्याची घोषणा संबंधित विमान कंपनीने केली आहे. मुंबईहून दुपारी १ वाजता उड्डाण … Read more

ओशिवरा गोळीबार प्रकरण उघड; अभिनेता कमाल रशीद खान पोलिसांच्या ताब्यात

मुंबई  : वृत्तसंस्था अभिनेता कमाल रशीद खान ऊर्फ केआरके याला ओशिवरा येथील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील तो मुख्य संशयित आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी उशिरा संध्याकाळी केआरकेला ओशिवरा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीत केआरकेने गोळीबार त्याच्या परवानाधारक बंदुकीतूनच झाल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर त्याची बंदूक जप्त … Read more

आठ वर्षांनंतर खंडणी प्रकरण उघड; रवी पुजारीला पोलिस कोठडी

मुंबई : वृत्तसंस्था प्रसिद्ध बॉलीवूड कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूझा आणि त्यांची पत्नी लिझेल डिसूझा यांच्याकडून खंडणी वसूल करण्याच्या आरोपाखाली गँगस्टर रवी पुजारीला अटक करण्यात आली आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वी, २०१८ मध्ये पुजारीने रेमो डिसूझा यांच्याकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. पाच वर्षांपूर्वी सेनेगलमधून हद्दपार झाल्यानंतर रवी पुजारी तुरुंगात होता. मात्र, या खंडणी … Read more

वंदे मातरम वादावरून संसदेत रणकंदन, काँग्रेसचा मोदींवर गंभीर आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधान इतिहासाची मोडतोड व विकृतीकरण करण्यात तज्ञ असल्याचा आरोप करत, गेल्या महिन्यात संसदेत वंदे मातरमवरील चर्चेदरम्यान राष्ट्रगीताच्या इतिहासाचा अपलाप करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तसेच गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचा अपमान करण्याचा प्रयत्न झाल्याचेही पक्षाने म्हटले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस व संपर्क … Read more

‘कैसे हराया…’ वक्तव्याने ठाणे महापालिकेत नवा वाद : सहर शेख यांना पोलिसांची नोटीस !

ठाणे : वृत्तसंस्था राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर अनेक महापालिकांमध्ये महायुतीला स्पष्ट आघाडी मिळाली आहे. ठाणे महानगरपालिकेतही महायुतीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असून १३१ नगरसेवकांपैकी तब्बल ६९ महिला नगरसेविका निवडून आल्याने महिला प्रतिनिधित्वाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. दरम्यान, ठाण्यातील मुंब्रा परिसरातून निवडून आलेल्या AIMIM च्या तरुण नगरसेविका सहर शेख यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल … Read more

तीन वर्षांनंतर सोयाबीन दरांना उसळी; पाच हजारांचा टप्पा ओलांडला

पुणे : वृत्तसंस्था गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून मंदीच्या गर्तेत अडकलेल्या सोयाबीन दरांनी अखेर उसळी घेतली असून बाजारात सोयाबीनचे दर ५ हजार ते ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. तब्बल तीन वर्षांनंतर प्रथमच सोयाबीनने पाच हजारांचा टप्पा ओलांडल्याने बाजारपेठेत तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. हमीभाव योजनेंतर्गत नाफेडकडून भोकरदन तालुक्यातील आन्वा, वाकडी, भिवपूर, दानापूर व … Read more

मोठी बातमी : कल्याणनंतर मुंबईतही मनसेचा पाठिंबा हवा : सरनाईक !

मुंबई :वृत्तसंस्था उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने केवळ मुंबईवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्थानिक नेतृत्वाला दिलेल्या सूचनेनुसार कल्याणमध्ये आम्हाला पाठिंबा मिळाला, असा दावा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. कल्याणमध्ये जसा पाठिंबा दिला गेला, तसाच मुंबईसह राज्यातील इतर महापालिका व जिल्हा परिषदांमध्येही मिळायला हरकत नाही, असे ते म्हणाले. राज ठाकरे यांचा पाठिंबा आम्हाला नेहमीच … Read more

रुग्णालय की निर्लज्जतेचा कळस? आजी दाराबाहेर, कर्मचारी निघून गेले

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली असून जिल्हा रुग्णालयातील अमानवी वागणुकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. उपचारासाठी आलेल्या एका वयोवृद्ध आजारी महिलेला सोनोग्राफी सेंटरच्या दाराबाहेर झोपवून कर्मचारी निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आजी जिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर उपचारासाठी दाखल होत्या. … Read more

महाराष्ट्रासाठी सुवर्णक्षण; दावोसातून ३० लाख कोटींचे करार

मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यात महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक गुंतवणूक करार झाले असून आतापर्यंत सुमारे ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार निश्चित झाले आहेत. येत्या काळात आणखी ७ ते १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दावोस … Read more

संतापजनक : ४ वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने केला अत्याचार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असताना आता बदलापूर पश्चिम परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या एका अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर स्कूल व्हॅनच्या चालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या अशाच एका घटनेच्या जखमा ताज्या असतानाच, … Read more