महाराष्ट्राच्या कर्तृत्वाला पद्मश्रीची मोहोर; कला, वैद्यक व शेती क्षेत्रातील दिग्गजांचा गौरव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने २०२६ सालासाठीच्या प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यंदा देशभरातील ४५ मान्यवरांना विविध पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या यादीत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा समावेश आहे. राज्याच्या मातीतील लोककला जिवंत ठेवणारे लोकनाट्य तमाशा महर्षी रघुवीर खेडकर, वैद्यकीय क्षेत्रात निःस्वार्थ सेवा बजावणाऱ्या … Read more

बार्शीत अनैसर्गिक महाआघाडी; भाजपच्या ताकदीपुढे विरोधक घाबरले – जयकुमार गोरे

सोलापूर : वृत्तसंस्था  सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजपविरोधात शिवसेनेचे दोन्ही गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले आहे. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री व भाजप नेते जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बार्शीतील ही तथाकथित महाआघाडी अनैसर्गिक … Read more

छगन भुजबळ वाचले कसे? दमानियांचा सवाल, फडणवीसांवर थेट आरोप

मुंबई : वृत्तसंस्था  महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंतर (एसीबी) आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) प्रकरणातही मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या निर्णयामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र संताप व्यक्त करत, या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे जाहीर केले आहे. पत्रकार परिषदेत … Read more

भाजपची १ कोटींची ऑफर असली तरी महापौर काँग्रेसचाच; वडेट्टीवारांचा ठाम दावा !

नागपूर : वृत्तसंस्था भाजपकडून नगरसेवकांना पदासोबत प्रत्येकी एक कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी (दि. २४) केला. दोन्ही बाजूंनी संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी अखेर नागपूरचा महापौर काँग्रेसचाच होईल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वडेट्टीवार यांनी सांगितले की, उबाठा, वंचित आणि दोन अपक्ष नगरसेवकांची जुळवाजुळव … Read more

‘मातृभूमी’तून उसळली देशभक्तीची ज्वाला; सलमानचा आर्मी अवतार व्हायरल !

मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्या बहुप्रतीक्षित ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटातील पहिले गाणे ‘मातृभूमी’ नुकतेच प्रदर्शित झाले असून, या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची तीव्र भावना जागृत केली आहे. प्रदर्शित होताच हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले असून एक्स (ट्विटर)वर ट्रेंडमध्ये आहे. ‘मातृभूमी’ या गाण्यात सलमान खान भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दमदार आर्मी लूकमध्ये … Read more

४०० कोटींच्या रोख कंटेनर चोरीचा संशय; नाशिकमधील तरुणाचे अपहरण, मारहाण

नाशिक : वृत्तसंस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर राजकीय वातावरण तापले असतानाच, कर्नाटकातील चोरली घाट परिसरात सुमारे ४०० कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याचा संशय व्यक्त होत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या संशयातून नाशिक जिल्ह्यातील एका तरुणाचे अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने संपूर्ण नाशिक … Read more

वादग्रस्त वक्तव्यानंतर सहार शेख यांची पोलिसांकडे जाहीर माफी

ठाणे : वृत्तसंस्था ठाणे महापालिका निवडणुकीत AIMIMला मुंब्रा परिसरात मिळालेल्या यशानंतर नव्याने निवडून आलेल्या नगरसेविका सहार शेख यांच्या एका वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. पोलिस चौकशीनंतर सहार शेख यांनी लेखी माफीनामा दिल्याची माहिती समोर आली असून, माफीनामा स्वीकारल्यानंतर हे प्रकरण मिटल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकीतील विजयानंतर केलेल्या भाषणात सहार शेख यांनी, … Read more

मुंबईत बिहार भवन उभारणारच; मनसेला बिहार सरकारचा थेट इशारा

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईत बिहार भवन उभारण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार विरोध दर्शवला असतानाच, आता या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. बिहार सरकारचे मंत्री अशोक चौधरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना थेट आव्हान देत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात बिहार भवन बांधणारच. बिहार भवन बांधण्याचं काम थांबवण्याइतकी ताकद … Read more

थकवा, चक्कर, केस गळती? दुर्लक्ष नको; महिलांमध्ये एनीमिया वाढतोय

महिलांमध्ये एनीमिया म्हणजेच रक्ताची कमतरता ही समस्या खूप सामान्य आहे. मात्र अनेक वेळा ही समस्या एखाद्या मोठ्या आजारामुळे नव्हे, तर रोजच्या जीवनातील छोट्या-छोट्या चुकीच्या सवयींमुळे वाढताना दिसते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वेळेवर लक्ष दिलं नाही तर ही समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते. आकडेवारीनुसार, भारतातील सुमारे ५७ टक्क्यांहून अधिक महिला एनीमियाने त्रस्त आहेत. शरीरात लोहाची कमतरता … Read more

लाडकी बहीण योजनेतील तक्रारींसाठी थेट संपर्क; विशेष हेल्पलाइन जाहीर

मुंबई : वृत्तसंस्था  राज्य सरकारने सुमारे दीड वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार उघडकीस आल्याने शासनाने त्याला आळा घालण्यासाठी ई-केवायसी करण्याचे निर्देश दिले होते. अनेक लाभार्थी महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही डिसेंबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा न झाल्याच्या तक्रारी … Read more