भाजप नेत्यांची हवेतील पतंगबाजी ; वडेट्टीवारांचा टोला !

नागपूर : प्रतिनिधी चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असून त्यासाठी आवश्यक संख्याबळ जमवण्यात यश आले आहे, असे स्पष्ट प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचा भाजप नेत्यांचा दावा म्हणजे केवळ “हवेतील पतंगबाजी” असल्याचा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता स्थापन करणे आणि काँग्रेसचा … Read more

काँग्रेसने भूमिका बदलली नाही तर नुकसान अटळ; प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत युती करूनही काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. केवळ २४ जागांवर समाधान मानावे लागल्याने काँग्रेसच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत, मुस्लिम मतांकडे पाहण्याची भूमिका बदलली नाही तर भविष्यात नुकसान अटळ असल्याचा थेट इशारा दिला … Read more

प्रणिती शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जयकुमार गोरे यांची जीभ घसरली; सोलापूरचे राजकारण तापले

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील २९ महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोलापूर महापालिकेतही भाजपला अपेक्षित यश मिळाल्यानंतर आता काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप मंत्री जयकुमार गोरे यांची जीभ घसरल्याने सोलापूरचे राजकारण चांगलेच तापले आहे. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर खासदार … Read more

घराणेशाहीवर मोदींचा घणाघात; नितीन नवीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नवीन यांची बिनविरोध निवड झाली असून ते भाजपचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले आहेत. मंगळवारी भाजप मुख्यालयात त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून नितीन नवीन यांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, “भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. लोकांना … Read more

हायकोर्टाचा स्पष्ट निकाल; मुलाला आईच्या जातीचा लाभ देण्याचे निर्देश !

नागपूर : वृत्तसंस्था जन्मापासूनच वडिलांसोबत न राहता आईसोबत वास्तव्यास असलेल्या मुलाला आईच्या जातीचे प्रमाणपत्र देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. याबाबत भंडारा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने आईच्या कागदपत्रांचा विचार करून निर्णय घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याचिकाकर्त्या मुलाचे आई-वडील त्याच्या जन्मापूर्वीच विभक्त झाले होते. त्यामुळे मुलगा जन्मापासून आईसोबतच राहत … Read more

पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर गायकवाडचा मृत्यू

सांगली : वृत्तसंस्था कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर गायकवाड याचा आज सांगलीत मृत्यू झाला. हृदयविकाराचा तीव्र झटका हे मृत्यूचे कारण असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. त्याच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, समीर गायकवाड याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांना … Read more

सायना नेहवालची व्यावसायिक बॅडमिंटनमधून निवृत्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताची स्टार बॅडमिंटनपटू व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिने व्यावसायिक बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतल्याची अधिकृत पुष्टी केली आहे. गुडघ्याच्या जुन्या आणि गंभीर आजारामुळे आता उच्च स्तरावर स्पर्धा करणे शक्य नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. सायनाने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२३ मध्ये सिंगापूर ओपन स्पर्धेत खेळला होता. मात्र, त्यावेळी तिने निवृत्तीची कोणतीही औपचारिक … Read more

महायुतीचा आनंद फिका; नागपूरमध्ये ४० नगरसेवकांचे भवितव्य अडचणीत

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होताच महायुतीत आनंदाचे वातावरण असताना, नागपूर महानगरपालिकेत सत्तेला मोठा हादरा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने राज्यातील अनेक महापालिकांवर सत्ता स्थापन केली असली, तरी नागपूर मनपात निवडून आलेल्या ४० नगरसेवकांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे. पुढील ४८ तासांत या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता असून, तसे … Read more

कार खरेदीचं स्वप्न होणार साकार : या 4 सरकारी बँका देत आहेत सर्वात स्वस्त कार लोन

तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत आहात का, पण तुमचं कुठे अडलं आहे का, असं असेल तर ही बातमी नक्की वाचा, आज आम्ही तुम्हाला अशा 4 सरकारी बँकांच्या कार कर्जाच्या व्याजदराबद्दल सांगणार आहोत, ज्या आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देत आहेत. चला जाणून घेऊया. चला तर मग जाणून घेऊया. स्वत:ची कार खरेदी करणे हे बहुतांश … Read more

जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत तणाव; युतीवर अट-शर्तींचे राजकारण

मुंबई : वृत्तसंस्था जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संभाव्य युतीवरून राजकीय वातावरण तापले आहे. युतीची चर्चा सुरू असतानाच शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी थेट अट घातल्याने या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने महायुती सरकारमधून बाहेर पडल्याशिवाय युती शक्य नसल्याचे जानकर यांनी … Read more