सोने–चांदीचे भाव आकाशाला; चांदी ३ लाखांवर, सोनाही विक्रमी

मुंबई : वृत्तसंस्था सोने आणि चांदीच्या किमतीत घट होण्याचे सर्व अंदाज व्यर्थ ठरत आहेत. दोन्ही मौल्यवान धातू दररोज विक्रम मोडत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी, चांदीने अशी खळबळ उडवून दिली. कारण १ किलो चांदीच्या किमतीने चक्क ३ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. इतिहासात पहिल्यांदाच चांदीने ही पातळी ओलांडली आहे. दरम्यान, सोन्याच्या किमतीनेही वेगाने वाढ होऊन … Read more

उन्हाळाच नाही, हिवाळाही डिहायड्रेशनचा काळ!

डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता ही समस्या फक्त उन्हाळ्यातच होते, असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र आरोग्यतज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यातही शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते आणि ती वेळेत ओळखली नाही, तर आरोग्याच्या अनेक तक्रारी वाढू शकतात. हिवाळ्यात डिहायड्रेशन का होते? थंडीत घाम कमी येतो आणि तहानही फारशी लागत नाही. त्यामुळे अनेकजण पाणी कमी पितात. याशिवाय चहा, कॉफी … Read more

सफाई कामगार दाम्पत्याचा मुलगा थेट नगरसेवक : झोपडपट्टीतून सभागृहापर्यंतचा प्रवास !

पुणे : वृत्तसंस्था पुणे महापालिका निवडणुकीत अनेक दिग्गज नगरसेवकांसह विविध क्षेत्रांतील उमेदवारांनी विजय मिळविला आहे. मात्र, यामध्ये महापालिकेच्या सफाई कर्मचारी असलेल्या दाम्पत्याचा मुलगा नगरसेवक म्हणून सभागृहात पोहोचल्याने ही निवडणूक विशेष चर्चेत आली आहे. भाजपचे प्रभाग क्रमांक २७ नवी पेठ–पर्वती येथून अमर आवळे यांनी विजय मिळविला आहे. अमर आवळे यांचे वडील पुणे महापालिकेच्या ड्रेनेज विभागात बिगारी … Read more

जीवदानी मंदिरात बनावट लग्नाचा डाव; शाळकरी मुलीवर अत्याचार

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील वसई-विरार परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शाळकरी मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. विरारच्या प्रसिद्ध जीवदानी मंदिरात नेऊन गळ्यात मंगळसूत्र बांधून आपले लग्न झाले आहे असा बनाव आरोपीने रचला. त्यानंतर त्या आरोपीने पीडितेवर अत्याचार केले. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा … Read more

बीडच्या राजकारणात मोठी उलथापालथ; शरद पवारांना धक्का तर शिंदेंची ताकद वाढली !

बीड : वृत्तसंस्था जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. केज मतदारसंघाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, बीड जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढल्याचे राजकीय वर्तुळात … Read more

शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? ; शिंदेंचा ठाकरेंना इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबईचा महापौर कोणाचा होणार? यावरून कमालीची गुप्तता आणि रस्सीखेच पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील ‘ताज लँडस् एन्ड’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे. आज त्यांनी या नगरसेवकांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी शिंदेंनी संवाद साधला आहे. शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? शिवसेनेला … Read more

महापालिका कमिशनचा धंदा नाही” : नवनिर्वाचित नगरसेवकांना मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

पुणे : वृत्तसंस्था महापालिका हे आपले कमिशन नाही आणि महापालिका हा आपला व्यवसायही नाही. पालिका हे आर्थिक, सामाजिक विकासाचं माध्यम आहे. त्यामुळे पारदर्शकपणे, प्रामाणिकपणे काम पार पाडणे आवश्यक आहे. कोणी कितीही मोठा असला, तरी कोणाचाही उन्माद, गैरकारभार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील नवनिर्वाचित उमेदवारांना दिला आहे. महापालिका निवडणूक निकालानंतर … Read more

मनपा निकालानंतर शिंदे समर्थकाच्या कारला आग, सिसिटीव्हीत थरार कैद !

पुणे : वृत्तसंस्था  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण तापलेले असतानाच थेरगाव परिसरात जाणीवपूर्वक कार जाळण्याची धक्कादायक घटना घडली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री उभ्या असलेल्या एका कारला ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावण्यात आल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यामुळे शहरातील राजकीय तणाव अधिकच वाढला आहे. ही कार आकाश बारणे यांच्या मालकीची असून, ते … Read more

महायुतीचा महापालिकांत दणदणीत विजय; अमोल मिटकरींची बॅलेट पेपरची मागणी

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालांमध्ये भाजप-शिंदेसेना युतीने २४ महापालिकांवर वर्चस्व मिळवले असून, ९ महापालिकांत भाजपने स्वबळावर सत्ता स्थापनेचा आकडा गाठला आहे. या निकालांमुळे भाजप राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला आहे. या निकालांत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) … Read more

राज्यात पुन्हा कडाक्याची थंडी वाढण्याची शक्यता

मुंबई वृत्तसंस्था : राज्यात सध्या हवामानाचा लहरीपणा प्रकर्षाने जाणवत असून कधी पावसाच्या सरी तर कधी थंडीचा कडाका अनुभवायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली, तर गेल्या काही दिवसांपासून दुपारी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. थंडी ओसरत असल्याचे चित्र दिसत असतानाच आरोग्याच्या समस्या मात्र वाढताना दिसत आहेत. वायू प्रदूषणात … Read more