“दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” – बिग बॉस मराठी ६ चा धमाकेदार प्रोमो प्रदर्शित

मुंबई वृत्तसंस्था : “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार” या जबरदस्त थीमसह बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनचा बहुप्रतिक्षित प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेची लाट उसळली आहे. अभिनेता रितेश देशमुख याच्या दमदार उपस्थितीमुळे आणि अर्थपूर्ण संवादांमुळे यंदाचा सिझन केवळ मनोरंजनापुरता न राहता स्पर्धकांच्या नशिबाचा खेळ ठरणार, याचे संकेत मिळत आहेत. प्रोमोमध्ये रितेश भाऊंचे कोड्यातून … Read more

आजपासून रेल्वे प्रवास महागला; २१५ किमीहून अधिक अंतरासाठी भाडेवाढ लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रेल्वेने आजपासून प्रवासी भाड्यात वाढ लागू केली असून, त्यामुळे लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास महागला आहे. नव्या निर्णयानुसार प्रति किलोमीटर २ पैसे दराने भाडेवाढ करण्यात आली आहे. ही वाढ २१५ किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी लागू असणार आहे. त्यामुळे आता लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाढीव भाडे मोजावे लागणार आहे. नव्या दररचनेनुसार, जर … Read more

“धर्म पाहून मत देता, पण धर्मांतर करणार आहात का?” : मतदारांना प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील बदलत्या राजकीय आणि सामाजिक वातावरणावर परखड भाष्य करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट मतदारांनाच आरसा दाखवला आहे. “जे लोक फक्त धर्म पाहून मतदान करतात, त्यांना माझा एकच प्रश्न आहे – तुम्ही किंवा तुमचे कुटुंब भविष्यात धर्मांतर करणार आहात का? जर करणार नसाल, तर मग आरएसएस आणि भाजप धर्माचा … Read more

एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू : नांदेड येथे खळबळ !

नांदेड : वृत्तसंस्था राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कुटुंबातील 2 मुलांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तर त्यांच्या आई-वडिलांचे मृतदेह घरातच झोपलेल्या स्थितीत आढळले. या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ माजली असून, ही घटना आत्महत्या आहे की घातपात? याविषयी उलटसूलट चर्चा रंगली आहे. यासंबंधीच्या … Read more

मुंबईच्या राजकारणात नवा ट्विस्ट; ठाकरे युती आणि सदावर्तेंची ‘कमळ खुर्ची’

मुंबई : प्रतिनिधी राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. इच्छुक उमेदवार, पक्षनेते आणि कार्यकर्ते सक्रिय झाले असताना, सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची (बीएमसी). देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएमसीच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. याच पार्श्वभूमीवर काल मुंबईच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. अनेक वर्षांच्या … Read more

चार दिवसांत सोनं महागलं, चांदीने गाठला २.२२ लाखांचा टप्पा

मुंबई : वृत्तसंस्था उत्तर महाराष्ट्राचे मानबिंदू आणि ‘सुवर्णनगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरांनी नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या दरात प्रति तोळा ३,२०० रुपयांची वाढ झाली असून, चांदीच्या दरात तब्बल १७ हजार रुपयांची मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. परिणामी चांदीने प्रति किलो २ लाख २२ हजार रुपयांचा … Read more

बॉम्बस्फोटाने तरुणाचा जागीच मृत्यू, बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचे सावट

नवी दिल्ली वृत्तसंस्था : बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार भडकला असून राजधानी ढाक्यात झालेल्या बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. मोगबाजार परिसरात बुधवारी सायंकाळी घडलेल्या भीषण स्फोटात 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नाश्ता आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या या निष्पाप तरुणावर अचानक मृत्यू कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे 7.10 वाजता मोगबाजार फ्लायओव्हरवरून अज्ञात … Read more

कर्नाटकात भीषण अपघात; स्लीपर बसला आग, १० हून अधिक प्रवासी जिवंत जळाले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात स्लीपर बसला आग लागून १० हून अधिक प्रवासी जिवंत जळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार मृतांचा आकडा १२ ते १७ दरम्यान असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील हिरियूर तालुक्यात रात्री सुमारे २.३० वाजण्याच्या … Read more

महायुती सरकारचा निर्णायक निर्णय; थेट निवडून आलेल्या अध्यक्षांना सदस्यत्व व मतदानाचा हक्क

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षांना सदस्यत्वासह मतदानाचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुमताचा पेच निर्माण झाल्यास अध्यक्षांना थेट मतदान करून निर्णय … Read more

बांगलादेशात हिंदू कुटुंबाचे घर जाळले, भारतात संतापाचे निदर्शने !

नवी दिल्ली वृत्तसंस्था : बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंना लक्ष्य करून होणाऱ्या हिंसक घटनांची मालिका अद्याप थांबलेली नाही. ताज्या घटनेत चितगाव जिल्ह्यातील रौजन उपजिल्ह्यात एका हिंदू कुटुंबाच्या घराला अज्ञातांनी आग लावली. या आगीत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून पाळीव प्राणीही मृत्युमुखी पडले. हल्लेखोरांनी घरामागील कुंपण तोडल्याने कुटुंबीयांना जीव वाचवण्यासाठी पळ काढता आला. घटनास्थळी सापडलेल्या … Read more