वादाच्या भोवऱ्यातून बिनविरोध सत्ता; अनगर नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यभरातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र दुसरीकडे निकालापूर्वीच मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिलेल्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीवर भाजपचंच कमळ फुललं आहे. अनगर नगरपंचायत निवडणुकीत सर्व 17 सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी केवळ एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने बिनविरोध जाहीर करण्यास आयोगाने मान्यता देण्यात आली आहे. … Read more

सोनं-चांदीचे दर गगनाला मात्र गुंतवणूकदार संभ्रमात

मुंबई वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत असून आता पुन्हा एकदा या मौल्यवान धातूंनी जोरदार उसळी घेतली आहे. दिवाळीपूर्वी सोन्याचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला होता, त्यानंतर काहीशी घसरण झाली. मात्र डिसेंबरमध्ये सोन्या-चांदीने पुन्हा तेजीत झेप घेत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. 2025 या वर्षात सोन्याच्या किमतीत तब्बल 73 … Read more

नियमभंग महागात! कोटक महिंद्र बँकेवर RBIचा 61.95 लाखांचा दंड

मुंबई वृत्तसंस्था : भारतीय बँकिंग व्यवस्थेवर करडी नजर ठेवणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोठी कारवाई करत देशातील आघाडीच्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या कोटक महिंद्र बँकेवर 61.95 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमांचे उल्लंघन, कामकाजातील बेफिकीरपणा आणि नियामक सूचनांकडे दुर्लक्ष केल्याच्या गंभीर प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयच्या तपासात कोटक महिंद्र बँकेने … Read more

राज्यात थंडीचा कडाका तर पुढील 72 तासांत पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील किमान तापमानात झालेल्या घटेमुळे अनेक भागांत थंडीची लाट जाणवत असून उर्वरित राज्यातही थंडीचा प्रभाव वाढताना दिसत आहे. हवामान विभागाने किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता वर्तवली असली, तरी थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. उत्तर भारतात वाढलेल्या थंडीचा परिणाम महाराष्ट्रात जाणवत असून शीतलहरी अधिक तीव्र झाल्या आहेत. याचबरोबर वातावरणातील बदल … Read more

ईडीची मोठी कारवाई; सेलिब्रिटींच्या हजार कोटींहून अधिक मालमत्ता जप्त

नवी दिल्ली प्रतिनिधी : बेकायदेशीर सट्टेबाजी प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी मोठी कारवाई करत माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, बॉलिवूड अभिनेता सोनू सूद, अभिनेत्री नेहा शर्मा यांच्यासह अनेक नामवंत सेलिब्रिटींच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे क्रीडा आणि मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणात मॉडेल-अभिनेत्री उर्वशी रौतेलाची आई, बंगाली अभिनेता अंकुश हाजरा, माजी … Read more

संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवे वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटवण्याची मागणी

बीड प्रतिनिधी : बीड न्यायालयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू असून, या खटल्याला आता नवे वळण मिळाले आहे. सरकारी पक्षातर्फे वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सुरुवातीचा युक्तिवाद मांडल्यानंतर, वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींनी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा दावा करत, त्यांना या खटल्यातून बाजूला करण्यासाठी न्यायालयात … Read more

शरीफ उस्मान हादी हत्या प्रकरणाने बांगलादेश पेटला; भारतातून शेख हसीना यांना अटक करून आणण्याची मागणी

मुंबई प्रतिनिधी : बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून, माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर देशात हिंसाचार उसळला आहे. सिंगापूरमध्ये 18 डिसेंबर 2025 रोजी शरीफ उस्मान हादी यांच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र … Read more

मुंबई, नागपूरसह राज्यातील न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई, नागपूर प्रतिनिधी : राज्यातील न्यायव्यवस्थेला हादरवून सोडणारी गंभीर घटना गुरुवारी समोर आली. मुंबई उच्च न्यायालयासह वांद्रे, किल्ला कोर्ट आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली. या धमकीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून, पोलिस व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबई पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च … Read more

मराठी शाळेच्या आठवणी जागवणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा ट्रेलर प्रदर्शित

अलिबाग प्रतिनिधी : मराठी शाळांच्या अस्तित्वावर हलक्याफुलक्या पण परिणामकारक पद्धतीने भाष्य करणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. विशेष बाब म्हणजे, या चित्रपटाचे चित्रीकरण ज्या अलिबागमधील नागाव येथील शाळेत झाले, त्याच शाळेच्या चौकात ट्रेलर अनावरणाचा सोहळा पार पडला. कधी वर्गखोल्यांत घुमणारे आवाज, बाकांवर कोरलेली नावं, फळ्यावर उमटलेले धडे आणि … Read more

CNG आणि PNG स्वस्त होणार, 1 जानेवारी 2026 पासून नवे दर लागू

मुंबई : 2026 या नवीन वर्षाची सुरुवात सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) आणि घरगुती वापरातील पाईपद्वारे पुरवठा होणाऱ्या नॅचरल गॅसच्या (PNG) किमती कमी होणार असून, हे नवे दर 1 जानेवारी 2026 पासून लागू होतील. पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड (PNGRB) ने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. PNGRB चे सदस्य ए.के. … Read more