पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेस सुरवात

पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक- 2020 अंतर्गत मतमोजणी प्रक्रियेस आज सकाळी 8 वाजता सुरवात झाली. पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरात मतमोजणी कामकाज होत आहे.  विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मतमोजणी कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. याठिकाणी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून निलिमा केरकट्टा, श्रीकांत देशपांडे उपस्थित आहेत. तसेच पुणे … Read more

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात काँग्रेसचे आंदोलन

मुंबई :  केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. हा कायदा रद्द करण्यात यावा, यासाठी दिल्लीमध्ये गेल्या सात दिवसपासून शेतकरी आंदोलन करीत आहे. आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघालेला नाही. अशावेळी शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस पक्ष आज, गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी … Read more

सर्वसामन्यांसाठी मुंबई लोकल होणार खुली? येत्या आठवड्यात निर्णय

मुंबई: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन बंद आहे. सरकार अनलॉकच्या माध्यमातून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच आता लोकलअभावी सुरू असलेल्या सर्वसामान्यांच्या प्रवासयातना आता लवकरच संपणार आहेत. कारण करोनाबाधितांच्या संख्येत होणारी घट लक्षात घेता, प्रशासनाने मुंबईत लोकल सर्वांसाठी खुली करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या आठवड्यात होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत लोकलमुभेची … Read more

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का ; भाजपचे अमरिश पटेल विजयी

धुळे: पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजनी आज होत आहे.  या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपच्या अमरीश पटेल यांचा विजय.  त्यांनी काँग्रेसच्या अभिजित पाटलांचा पराभव केला आहे. भाजपच्या अमरीश पटेल यांना 332, तर काँग्रेसचे अभिजित … Read more

एस.ई.बी.सी. संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार

मुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एस.ई.बी.सी. संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. श्री. थोरात म्हणाले की, 7 जिल्हयातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे … Read more

पंकजा मुंडे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

बीड: कोरोनाची लक्षणे दिसताच खबरदारी म्हणून भाजप नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आयसोलेट झाल्या होता. या दरम्यान त्यांनी खात्री म्हणून कोरोना चाचणी केली होती. त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याचं सांगत त्यांनी त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. पंकजा यांच्या ट्विटनंतर धनंजय मुंडे यांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. तसंच भाऊ म्हणून मी तुझ्यासोबत … Read more

….म्हणून संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज (बुधवारी) लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. संजय राऊत यांच्यावर गुरुवारी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. संजय राऊत यांनी शनिवारी लीलावती रुग्णालयात आरोग्य तपासणी केली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र त्यांना काहीसा ताण आणि थकवा जाणवत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्रास वाढू लागल्यानं पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा डॉक्टरांनी सल्ला … Read more

लोटे येथील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव; १ कोटी १० लाखांना विक्री

रत्नागिरी : खेड तालुक्यातील लोटे येथील दाऊदच्या मालमत्तेचा अखेर लिलाव झाला आहे. स्थानिक ग्रामस्थ रवींद्र काते यांनी सर्वाधिक बोली लावून ही जमीन खरेदी केली असून ती तब्बल १ कोटी १० लाख इतक्या किमतीला विकत घेतली आहे. सेफमे यांनी हा ऑनलाईन लिलाव मुंबईत आयोजित केला असून, रवींद्र काते यांनी तो जिंकला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. … Read more

अक्षयकुमार कदाचित त्यांना आंब्याच्या पेट्या घेऊन गेला असेल ; संजय राऊतांचा योगी आदित्यनाथांना टोला

मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मंगळवारी रात्री दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आले.  उत्तर प्रदेशातही फिल्म सिटी तयार करणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं.  मुंबईत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार याची भेट घेतली. अक्षयकुमार कदाचित त्यांना आंब्याच्या पेट्या घेऊन गेला असेल, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. देशात … Read more

पेट्रोल-डिझेलचा भडका ; जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्लीः  भारतीय तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डीझेल च्या दरात वाढ केली आहे. मागील दोन दिवसापासून कोणतीही वाढ केलेली नव्हती मात्र आज वाढ केलीय. आज बुधवारी पेट्रोलचे भाव 15 पैसे प्रतिलिटर आणि डिझेलचे भाव 23 पैसे प्रतिलिटरनं वाढवले आहेत.  आहेत. आता राजधानी दिल्लीत 1 लिटर पेट्रोलचा भाव 82.49 रुपये झाला आहे. तर … Read more