‘पुणे पदवीधर’ निवडणुकीत भाजपला खिंडार ; महाविकास आघाडीची बाजी

पुणे  : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे.  पुणे पदवीधर मतदारसंघावर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत अरुण लाड यांना तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली आहेत, तर भाजप उमेदवार संग्रामसिंह देशमुख  यांना 73 हजार … Read more

ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसलेंचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

मुंबई : युनेस्को आणि लंडन येथील वार्की फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबध्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर येथील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे अभिनंदन केले आहे. पुरस्काराची बातमी समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी (दि.३) स्वत: त्यांना दूरध्वनी करून अभिनंदन आणि कौतुक केले. यावेळी  रणजितसिंह डिसले यांनी ग्रामीण भागात शिक्षणाविषयी आवड निर्माण … Read more

औरंगाबाद पदवीधर निवडणूकीत भाजपला धक्का ; राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण सलग तिसऱ्यांदा विजयी!

औरंगाबाद | विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या (Graduate Constituency Election result) पाच जागांपैकी चार जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. भाजपने पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा गमावली आहे. शिवाय औरंगाबादमध्येही राष्ट्रवादीने बाजी मारली. औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण विजयी झाले आहेत. सलग तिसऱ्यांदा त्यांनी … Read more

शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीयांसह उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत – जयंत पाटील

मुंबई | या राज्यातील शेतकरी… कष्टकरी… कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबतच उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे हेच या निकालाने सिद्ध होते असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विधानपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं आहे. जनमताचा हा कौल आम्ही नम्रपणे स्वीकारत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील … Read more

ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांची एकही जागा नाही, शिवसेनेनं आत्मपरीक्षण करावं – फडणवीस

मुंबई | राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली असून त्यात महाविकास आघाडीने जबरदस्त यश प्राप्त केले असून भाजपच्या बालेकिल्ल्याला देखील खिंडार पडलं आहे. महाविकास आघाडीच्या एकजुटीपुढे भाजपचा सूफडासाफ झाला आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराने ६ पैकी ५ जागा जिंकल्या. तर भाजपाला धुळे-नंदुरबारची एकमेव जागा … Read more

हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती ; खा.सुप्रिया सुळे

मुंबई |  विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला असून आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. दरम्यान हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती आहे असा विश्वासही खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. या यशासाठी अहोरात्र कष्ट करणारे कार्यकर्ते,मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा … Read more

जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही;वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

  मुंबई, दि. ३: जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेले राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही घाबरणार नाही असे सांगतानाच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला. सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित … Read more

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत घेण्यात येणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या विधानभवन येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या … Read more

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले….

मुंबई – महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून होत असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या नावाच्या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट राज्यात नाही, त्यांना राष्ट्रीय राजकारणात अधिक रस आहे, असं स्पष्ट करत शरद पवार यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. एका मराठी वृत्तपत्राला मुलाखत देतांना शरद … Read more

एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज !

मुंबई : कोविडच्या संकटांतून बाहेर पडताना, एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी उत्पन्न वाढीबरोबरच दैनंदिन खर्चात काटकसर करून, उपलब्ध साधन सामग्रीचा महत्तम वापर करण्यात चा प्रयत्न केला पाहिजे ,त्यासाठी एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड अनिल परब यांनी केली आहे. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या … Read more