तुम्ही शिंदे साहेबांच्या नादी लागा, माझ्या नादी लागू नका – श्रीकांत शिंदे यांची जोरदार टीका !

मुंबई : वृत्तसंस्था  शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाजप नेते व मंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली आहे आणि खुल्या आव्हानाद्वारे ठाणे किंवा कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवण्यास सांगितले आहे. “तुम्ही शिंदे साहेबांच्या नादी लागा, पण माझ्या नादी लागू नका,” असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री … Read more

सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी : महापौर विनायक कोंड्यालांनी दिले महत्वाचे आदेश !

सोलापूर : वृत्तसंस्था  उजनी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे कारण काय, असा सवाल करत महापौर विनायक कोंड्याल यांनी दोन दिवसाआड नियमित पाणीपुरवठा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच रात्री-अपरात्री पाणी देण्याचा प्रकार तातडीने थांबवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार सुभाष देशमुख यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत … Read more

अक्कलकोट तालुक्याचा मान उंचावला; अॅड. विश्वनाथ पाटील सह-अध्यक्षपदी विराजमान !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रिकल्चर (MACCIA) या राज्यातील अग्रगण्य व्यापार व उद्योग संघटनेच्या विधी व नियामक व्यवहार समितीच्या सह-अध्यक्षपदी मैंदर्गीचे सुपुत्र अॅड. विश्वनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील सुपुत्र असलेले अॅड. विश्वनाथ पाटील हे मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या नियुक्तीबद्दल … Read more

“वेळेचे नियोजन करा, यश तुमचेच” : कल्याणशेट्टी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !

अक्कलकोट : प्रतिनिधी तालुक्यातील नागनळळी येथील आश्रमशाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. आगामी परीक्षांना सामोरे जाताना प्रश्न नीट समजून घेऊन उत्तरे लिहावीत, वेळेचे योग्य नियोजन करावे आणि कॉपीमुक्त, प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, असा मौलिक सल्ला महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश मिळविणाऱ्या … Read more

आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवू नका; हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार !

वर्धा : वृत्तसंस्था टिपू सुलतान संदर्भातील वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका करत आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले. “भाजपने आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवू नयेत. प्रत्येक गोष्टीत जात आणि धर्म आणणे हा भाजपचा जुना डावपेच आहे. माझ्या विधानाला हिंदू-मुस्लिम दृष्टीकोन देऊन मुद्दाम वाद निर्माण केला जात आहे,” असा आरोप … Read more

तेजस ठाकरे यांची प्रकृती स्थिर; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू !

मुंबई :  वृत्तसंस्था शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव आणि प्रसिद्ध वन्यजीव संशोधक तेजस ठाकरे यांची बुधवारी प्रकृती अचानक बिघडल्याने मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. वैद्यकीय सूत्रांनी सांगितले की, प्राथमिक उपचार आणि तपासण्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून सध्या ते स्थिर आहेत. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तेजस यांची काही आवश्यक … Read more

पुण्यात भाजप-काँग्रेस राडा: आंदोलनात दगडफेक, २ जखमी !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचे तीव्र पडसाद रविवारी पुण्यात उमटले. येथे भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर उतरले होते. त्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यात काँग्रेसचे 2 कार्यकर्ते जखमी झाले. या प्रकरणी स्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. … Read more

‘पक्षविरोधी पाठिंबा सहन करणार नाही’; दानवेंचा इशारा

मुंबई : वृत्तसंस्था जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अत्यंत मर्यादित साधनसामग्रीतही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्हा परिषदेत ९ तर पंचायत समितीत ११ सदस्य निवडून आल्याने सत्तास्थापनेत उद्धवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. मात्र, भाजप व शिंदे गटाला पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार … Read more

महाशिवरात्रीनिमित्त ज्योतिर्लिंगांवर भाविकांची अलोट गर्दी ; ‘हर हर महादेव’च्या गजरात महाराष्ट्र दुमदुमला !

मुंबई : वृत्तसंस्था ‘बम बम भोले, ओम नमः शिवाय, हर हर महादेव’ असा अखंड जयघोष करत महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र शिवभक्तीत तल्लीन झाला आहे. राज्यातील बारा ज्योतिर्लिंगांसह सर्वच लहान-मोठ्या शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासूनच मंदिरांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या असून मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांना आकर्षक विद्युत … Read more

शिवरायांशी टिपू सुलतानांची तुलना; मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर कडाडून टीका

मुंबई : वृत्तसंस्था काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच टिपू सुलतान यांनाही मान दिला गेला पाहिजे, असे केलेले विधान राज्याच्या राजकारणात वादाचे केंद्र ठरले आहे. या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सपकाळ यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून मुघलांच्या जोखडातून … Read more