---Advertisement---

वीरशैव लिंगायत माळी समाजातर्फे सांस्कृतिक भवनाचे होणार उद्घाटन

By team
On: March 16, 2024 2:27 PM
Follow Us:
---Advertisement---

मैंदर्गी : प्रतिनिधी

येथील वीरशैव लिंगायत माळी समाजाच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन सोहळा व सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वीरशैव लिंगायत माळी समाजाचे अध्यक्ष काशिनाथ दिवटे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली

अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील हालहळळी(मैं) रस्त्यावरील कमळावेस जवळ विरशैव लिंगायत माळी समाजाचे नव्याने बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक वास्तु भवनाचे पूजन दिनांक 1 एप्रिल सोमवार रोजी होणार आहे तसेच 3 एप्रिल बुधवार रोजी या सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन आणि सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी इच्छुक वधू वर दाम्पत्य पालकांनी दि 25 मार्च 2024 रोजी पर्यंत नाव नोंदणी चालू असून नाव नोंदणीसाठी मैंदर्गी शहरातील लक्ष्मण दिवटे शिवचलप्पा देगाव काशिनाथ चिल्हाळ सिद्धलिंग काळी यांच्याकडे संपर्क साधावे मोबाईल नंबर 9960070526, 8698550880 यांच्याकडे नाव नोंदणी करण्यात यावी या सामुदायिक विवाह सोहळ्यात वधू-वरास आहेरचे कपडे ,मनी मंगळसूत्र, शालूसाडी,जोडवे देण्यात येणार असल्याची माहिती समाजाचे अध्यक्ष काशिनाथ दिवटे यांनी केले आहे यावेळी मलकण्णा म्हेत्रे, सुभाष इसापुरे, दौलप्पा बाणी बसवराज हुळळी ,सिद्धू पेडसंगी राजशेखर हिरतोट चंद्रकांत हिरतोट आदी समाजाचे कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!