---Advertisement---

तानवडे यांच्या निधीतून भाग्यवंती देवी मंदिर समोर हाय मास्ट दिव्याचे लोकार्पण

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१८ : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील महाराष्ट्र व कर्नाटक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भाग्यवंती देवी मंदिर समोर जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्या निधीतून विद्युत हायमास्ट दिवा बसवण्यात आला. त्याचा लोकार्पण सोहळा तानवडे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना आनंद तानवडे म्हणाले की, मी भाग्यवंती देवी मंदिर विकास कामासाठी निधी देण्यासाठी कटिबद्ध आहे. यापूर्वीही वागदरीच्या विकासासाठी भरघोस निधी दिला आहे. या ठिकाणी हजारो भाविक येत असतात रात्री भाविका येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने हायमास्ट दिवा मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी देवस्थान कमिटीच्यावतीने तानवडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वागदरीचे सरपंच श्रीकांत भैरामडगी, जेष्ठ नेते श्रीशैल ठोंबरे, मलकप्पा पोमाजी, वीरभद्र मंगाणे, प्रकाश पोमाजी, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष काशाप्पा पोमाजी, सदस्य शिवनिंगप्पा मड्डे व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महादेव सोनकवडे यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!