ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची अक्कलकोट रिपाईची मागणी ; तहसीलदारांना निवेदन

अक्कलकोट,दि.२० : अक्कलकोट तालुक्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांचे झालेल्या रब्बी पिकांचे ज्वारी, गहू, हरभरा, तसेच फळबाग द्राक्ष,पपईचे त्वरित जिल्हाधिकारी व तहसीलदारांना आदेश देऊन तलाठी व मंडल अधिकारी यांना पंचनामा करून त्याचा अहवाल शासनाला पाठवून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशा मागणीचे निवेदन रिपब्लीकन
पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे व जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी यांच्या नेतृत्वाखालील देण्यात आले.

यावेळी तालुका कोषाध्यक्ष अंबादास गायकवाड,अक्कलकोट शहर अध्यक्ष अजय मुकणार, सरचिटणीस शुभम मडिखांबे,शेर उपाध्यक्ष सुरेश सोनकांबळे, शेर संघटक अंबादास शिंगे, युवा नेते दत्ता कांबळे,इरणा दासाडे, रमेश दोडमनी, कुरनूर शाखा अध्यक्ष राजकुमार गवळी, बाबू सुतार, शकील नाईकवाडी आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाचे थैमान घातले असून त्यात शेतकऱ्यांचे हाता तोंडावर आलेली पिके त्यात द्राक्षे, ज्वारी, गहू, हरभरा, डाळिंब, पपई, आंबा असे अनेक कडधान्य व फळबागाचे नुकसान होऊन शेतकरी हतबल झाले आहे. तरी अशा शेतकऱ्यांचे शासन स्तरावरुन पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी.आधीच पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे आर्थिक मदत मिळालेले नसताना आता गारपीटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे तरी शेतकऱ्यांचे अंत न पाहता त्यांना त्वरित मदत सहाय्य निधी मिळवून द्यावी अन्यथा तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा मडिखांबे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!