---Advertisement---

दुधनी नगरपरिषदतर्फे उद्या शासन आपल्या दारी उपक्रम मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांची माहिती

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि. २९ : सर्वसामान्य जनतेची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत तसेच जनतेला विविध योजनांचे लाभ लवकर मिळावेत, यासाठी राज्य शासनामार्फत शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविला जात आहे. त्या अनुषंगाने तहसिल कार्यालय अक्कलकोट व दुधनी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दुधनी नगरपरिषद सभागृह येथे दुधनी येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी दिली. शहरातील व परिसरातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचण्यास व कमीत कमी कागदपत्रे,जलद मंजूरी व शासकीय निर्धारित शुल्कात नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता दि.३१ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यंत शिबीराचे आयोजन केले आहे. तरी नागरिकांनी या शिबिरात येऊन लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी वाळुंज यांनी केले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!