---Advertisement---

निवडणूक आयोगाचा निर्णय : आक्षेपानंतर हे दोन चिन्ह गोठवले

By team
On: July 20, 2024 9:43 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्य निवडणूक आयोगाने आपल्या निवडणूक चिन्ह यादीतून तुतारी आणि बिगुल / पिपाणी (ट्रम्पेट) ही मुक्त चिन्हे गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील परिपत्रक राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी शुक्रवारी जारी केले.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गटाला मूळ घड्याळ चिन्ह दिले गेले, तर शरद पवार गटाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे नवे चिन्ह बहाल करण्यात आले; पण केवळ साधर्म्यामुळे लोकसभा निवडणुकीत तुतारी आणि बिगुल/पिपाणी या चिन्हांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा फटका बसला.

लोकसभा निवडणुकीत या चिन्हाच्या घोळामुळे शरद पवार गटाला साताऱ्याची जागा गमवावी लागली, तर १० लोकसभा मतदारसंघांत एकूण सुमारे चार लाखांहून अधिक मते तुतारी आणि पिपाणी चिन्हांवर लढणाऱ्या अपक्षांनी घेतली. लोकसभा निकालानंतर शरद पवार गटाने राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार, आता राज्य निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिलासा देताना तुतारी आणि बिगुल/पिपाणी ही मुक्त चिन्हे गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा सध्या तरी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही; परंतु विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगही तुतारी आणि बिगुल ही दोन्ही चिन्हे गोठवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!