---Advertisement---

ग्राहकांसाठी सुवर्णसंधी : नऊ कॅरेटचे हॉलमार्क दागिने येणार बाजारात !

By team
On: July 18, 2025 3:48 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

देशात सोन्याचे दर गगनाला भिडत असतानाच, सामान्य ग्राहकांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने आता ९ कॅरेट सोन्यालाही हॉलमार्किंगची अधिकृत परवानगी दिली असून, लवकरच बाजारात अशा स्वस्त आणि प्रमाणित दागिन्यांची विक्री सुरू होणार आहे.

नवीन निर्णयानुसार ९ कॅरेट म्हणजे सुमारे ३८% शुद्धता असलेले सोनं, जे २४ कॅरेट सोन्याच्या तुलनेत ५०-६०% स्वस्त असते. सध्या २४ कॅरेट सोन्याची किंमत सुमारे १ लाख रुपये प्रति १० ग्रॅम इतकी असून, त्याच वजनाचे ९ कॅरेटचे हॉलमार्क दागिने ३८ ते ४० हजार रुपयांमध्ये मिळू शकतात.

पुण्यातील प्रसिध्द सराफ व्यावसायिक अमित मोडक म्हणाले, “ग्राहकांसाठी ही अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे. हॉलमार्किंगमुळे दर्जाची हमी मिळते आणि कमी बजेटमध्येही आकर्षक दागिने खरेदी करता येतात.”

हा निर्णय केवळ ग्राहकांसाठी नाही, तर सराफ व्यवसायासाठीही नवसंजीवनी ठरणार आहे. नवीन ग्राहकवर्ग बाजारात सहभागी होईल आणि दागिन्यांची मागणी वाढण्यास मदत होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

नवीन हॉलमार्क धोरणामुळे आता सोन्याचे दागिने प्रत्येकाच्या आवाक्यात येणार असून, “स्वप्नातील दागिने” खरेदी करण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!