---Advertisement---

ऊसतोड मजुरांना नेणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात : चार ठार तर १० जखमी

By team
On: April 2, 2024 11:15 AM
Follow Us:
---Advertisement---

सांगली : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका घडत असतांना नुकतेच सांगलीत ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ जण जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेने रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सांगली-सोलापूर महामार्गावर सोमवारी मध्यरात्री ही अपघाताची घटना घडली. ऊसतोड मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर आणि भरधाव ट्रकचा सांगली-सोलापूर महामार्गावर अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात दुर्दैवाने चार ऊसतोड मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींना तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातामधील मृतांमध्ये दोन महिला , एका मुलगा आणि लहान मुलीचा समावेश आहे.

सांगली सोलापूर महामार्गावर ऊसतोड मजुरांचा ट्रॅक्टर सोमवारी मध्यरात्री जात होता. या ट्रॅक्टरमध्ये १० हून अधिक ऊसतोड कामगार आणि त्यांची मुले होती. सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यातील चिकलगी भुयार येथील ऊसतोड कामगार असल्याची माहिती मिळत आहे. ते काम आटोपून परतत असताना सांगली-सोलापूर महामार्गावर अपघात झाला. सांगली-सोलापूर महामार्गावरून जाणाऱ्या या ट्रॅक्टरला मागून ट्रकने जोरात धडक दिली. या दुर्दैवी अपघातात ४ मुजरांचा मृत्यू झाला आहे. तर काही मजूर जखमी झाले. या जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!