---Advertisement---

सोशल मिडीयावर ओळख : विवाहित तरुणीवर सामूहिक अत्याचार

By team
On: April 22, 2024 11:09 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

समाजमाध्यमात (सोशल मीडिया) झालेल्या ओळखीतून विवाहित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी कुणाल नंदकुमार गलांडे (वय २७, रा. नाना पेठ), त्याचे मित्र आतिष, समीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, याबाबत एका २६ वर्षीय विवाहित तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी कुणाल याच्याशी तरुणीची जुलै २०२२ मध्ये समाजमाध्यमातून ओळख झाली होती. पीडित विवाहितेला मुलगा आहे. कुणालने तिच्याशी संपर्क वाढविला. तिला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर कुणाल आणि त्याचा मित्र आतिषने तरुणीला नाशिक परिसरात फिरायला नेले. तेथे धमकावून कुणाल आणि त्याचा मित्र आतिषने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर कुणाल आणि त्याचा मित्र समीरने या तरुणीला गणपतीपुळे येथे फिरायला नेले. तेथे तिला धमकावून दोघांनी बलात्कार केला.

आरोपींनी तरुणीच्या लहान मुलास मारहाण करून त्याला कोंडून ठेवले. त्याला विवस्त्र करून त्याला त्रास दिल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. तरुणीच्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!