---Advertisement---

तडवळ येथे रिपाइं आठवले गटाच्या शाखेचे उद्घाटन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील महाराष्ट्र आणि कर्नाटक सिमेवर वसलेल्या तडवळ गावात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे शाखेचे उद्घाटन रिपाइंचे तालुकाअध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी यांच्या उपस्थितीत पार पडले.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून तडवळ येथील भिमनगर समाज मंदीर प्रांगणात या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर मंत्री आठवले यांच्या नावाच्या केक कापून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या व सामूहिक बुध्दवंदना करण्यात आली.

यावेळी युवक अध्यक्ष अप्पा भालेराव,शहराध्यक्ष अजय मुकणार, अंबादास गायकवाड, राजु बोरगांव, दिलीप माळी, चंद्रकांत गायकवाड, सागर बनसोडे, महिबूब शेख, सुनील शिवशरण, सिध्दार्थ गायकवाड, प्रा. सागर सोनकांबळे, आकाश माने, नूतन शाखेचे अध्यक्ष उमेश शिवशरण, उपाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, सचिव राजशेखर गायकवाड, सचिव भालेसाहेब शिवशरण, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.बसवंत गायकवाड तर आभार सिध्दार्थ गायकवाड यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!