---Advertisement---

भारतीय संघाने इंग्लंडचा २५ धावांनी केला पराभव;कसोटी मालिका ३-१ अंतराने जिंकली

Follow Us:
---Advertisement---

अहमदाबाद : येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा २५ धावांनी पराभव केला.या विजयासह भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली. चौथ्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २०५ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने ऋषभ पंतच्या १०१ आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद ९६ धावांच्या मदतीने ३६५ धावा केल्या. तसेच पहिल्या डावात १६० धावांची आघाडी घेतली. इंग्लंड संघाला ही आघाडी मिळवता आली नाही. सामन्याच्या तिसर्‍या दिवशीच १३५ धावांवर डाव गुंडाळला. सामन्यात अक्षर पटेलने नऊ गडी बाद केले तर रविचंद्रन अश्विनने आठ बळी घेतले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!