---Advertisement---

भारतीय जवानांकडून मोठी कारवाई; चार दहशतवाद्यांचा खात्मा !

On: February 24, 2021 2:02 PM
Follow Us:
---Advertisement---

अनंतनाग: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. भारतीय सैन्य दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. अनंतनाग येथील श्रीगुफवारामधील शालगुल वन क्षेत्रात ही कारवाई झाली. पोलीस, भारतीय सैन्य दल आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तरित्या अनंतनाग येथे दहशतवाद्यांच्या सर्च ऑपरेशन सुरू केले. यावेळी दहशतवाद्यांनी सैन्य दलावर गोळीबार करण्यास सुरूवात केली. सैन्य दलाने सर्व एक्झिट पॉईंट्स सील करुन शोध मोहीम सुरू केली. त्याचवेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर भारतीय सैन्याने प्रत्युत्तर देत गोळीबार केला.

यापूर्वी १८ फेब्रुवारी रोजी रात्रीपासून ते १९ फेब्रुवारी सकाळपर्यंत शोपियां येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. शोपियां येथे ठार झालेले तिन्ही दहशतवादी हे दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा सोबत जोडलेले असल्याची माहिती समोर आली होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!