---Advertisement---

संतापजनक : अंगात सैतान काढतो म्हणत दोघीवर केला अत्याचार

By team
On: February 17, 2024 9:14 AM
Follow Us:
---Advertisement---

अहमदनगर : वृत्तसंस्था

मुलींच्या अंगात सैतान आहे, म्हणून तुमच्यावर संकटे येतात. ते दूर करतो. त्यासाठी मुलींना दररोज चर्चमध्ये प्रार्थनेसाठी पाठवा, असे सांगून मुलींना चर्चमध्ये बोलावून घेतले. दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार केला. ही घटना डिसेंबर २०२३ ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान सोनई (ता. नेवासा) येथे घडली. याप्रकरणी तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पास्टर उत्तम बलवंत वैरागर संजय वैरागर आणि सुनील वैरागर अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेची आई नेहमी आजारी असते. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांना चर्चमध्ये जाण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून फिर्यादी यांची आई चर्चमध्ये जाऊ लागली. आरोपींनी मुलींमध्ये सैतान असल्याचे सांगत ते दूर करण्यासाठी त्यांना चर्चमध्ये बोलावून घेतले व अत्याचार केला

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!