पुणे : निवडणूक आयोगाने कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या तारखा बदलले आहे. २७ फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाची तारीख निवडणूक आयोगाने बदलली. आता २६ फेब्रुवारी रोजी या दोन्ही विधानसभा पोटनिवडणूक साठी मतदान होणार आहे.
२१५-कसबा पेठ आणि २०५-चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आता २७ फेब्रुवारी ऐवजी रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार-भारत निवडणूक आयोगाची माहिती.#Pune #Elections@MahaDGIPR pic.twitter.com/F2OtWM9Ys4
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) January 25, 2023
पुणे जिल्हा निवडणूक आयोगाकडून पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ यांच्याबद्दल एक अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला होता. या दोन्ही पोटनिवडणुकी दरम्यान बारावीच्या परीक्षा आहेत असे हवलात नमूद केले होते. या गोष्टीची दखल घेतल्यानंतर आयोगाने चिंचवड आणि कसबा पेठ निवडणुकीच्या साठी होणाऱ्या मतदानाच्या तारखा बदलल्या आहेत.